coronavirus : औरंगाबादेत दोन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 10:17 IST2020-05-27T10:13:45+5:302020-05-27T10:17:36+5:30

औरंगाबादेत कोरोनाबाधित मयत रुग्णांची एकूण संख्या ६१ झाली आहे.

coronavirus: Two coronavirus patients die during treatment in Aurangabad | coronavirus : औरंगाबादेत दोन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

coronavirus : औरंगाबादेत दोन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाने आणखी दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. इंदिरानगर-बायजीपुरा येथील ५६ वर्षीय पुरुष आणि हुसैन कॉलनीतील ३८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती घाटीचे माध्यम समनव्यक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.

इंदिरानगर- बायजीपुरा येथील रूग्ण २५ मे रोजी रात्री ११ वाजता घाटीतील अपघात विभागात दाखल झाला होता. त्यांना दम लागणे, ताप येणे, खोकला ही लक्षणे होती. रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. परंतु रात्री ११.४० वाजता रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर २६ एप्रिल रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

हुसैन कॉलनी येथील रूग्ण २४ मे रोजी घाटीत दाखल झाला होता. त्यांचा अहवाल २५ रोजी पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरू असताना २६ मे रोजी रात्री ७.३० वाजता रुग्णाचा मृत्यू झाला. या दोन मृत्यूमुळे औरंगाबादेत कोरोनाबाधित मयत रुग्णांची एकूण संख्या ६१ झाली आहे.

Web Title: coronavirus: Two coronavirus patients die during treatment in Aurangabad