coronavirus : औरंगाबादमध्ये दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू; आतापर्यंत ३४ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 18:30 IST2020-05-18T18:28:23+5:302020-05-18T18:30:26+5:30

सोमवारी दिड तासाच्या अंतराने दोघांचा मृत्यु झाला.

coronavirus: Two corona patients die in Aurangabad; 34 death so far | coronavirus : औरंगाबादमध्ये दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू; आतापर्यंत ३४ बळी

coronavirus : औरंगाबादमध्ये दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू; आतापर्यंत ३४ बळी

औरंगाबाद : कोरोनाबाधित पैठण गेट येथील ५६ वर्षीय महिला व बुढ्ढीलेन येथील ४२ वर्षीय पुरुषाचा सोमवारी दिड तासाच्या अंतराने मृत्यु झाला. त्यामुळे शहरातील मृत्युचा आकडा ३४ झाला, अशी माहिती घाटी रुग्णालयाचे माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली आहे. 

पैठण गेट येथील ५६ वर्षीय महिलेला रविवारी घाटीत रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्या बाधित असल्याचा अहवाल रविवारी संध्याकाळी सहा वाजता प्राप्त झाला. तिव्र श्वसन विकार, मधुमेह व उच्चरक्तदाबा सोबत कोरोना झाल्याने त्यांचा सोमवारी दुपारी साडे बारा वाजता मृत्यु झाला. तर बुढ्ढीलेन येथील ४२ वर्षीय व्यक्तीला १४ मे रोजी घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्याच दिवशी ते बाधित असल्याचे निदान झाले. त्याच्यावर उपचार सुरु असतांना दुपारी दोन वाजता त्यांचा मृत्यु झाला. लठ्ठपणा, तीव्र श्वसनविकार, उच्चरक्तदाब व कोरोनामुळे त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉ. गायकवाड यांनी कळवले आहे.

Web Title: coronavirus: Two corona patients die in Aurangabad; 34 death so far