coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 14:45 IST2020-08-14T14:42:43+5:302020-08-14T14:45:52+5:30
आतापर्यंत एकूण मृत्यूची संख्या ५७५ झाली आहे.

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू
औरंगाबाद : जिल्ह्यातील तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कोरोना बळींची संख्या ५७५ वर गेली आहे.
बजाजनगर येथील ६१ वर्षीय पुरुष, गांधी नगर येथील ७० वर्षीय महिला, घाणेगाव (ता गंगापूर) येथील ६१ वर्षीय पुरुष बाधितांचा घाटी रुग्णालयात उपचारदारम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण मृत्यूची संख्या ५७५ झाली आहे.
आज ११८ बाधितांची वाढ
जिल्ह्यातील ११८ रुग्णांचे अहवाल शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ हजार पार गेली आहे. एकूण बाधितांची संख्या १८,०८५ झाली आहे. त्यापैकी १३,२५४ बरे झाले तर ५७५ जणांचा मृत्यू झाल्याने सध्या ४२५६ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.