CoronaVirus : औरंगाबादमध्ये तिघांनी कोरोनाचा विळखा तोडला; रुग्णालयातून मिळाली सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 20:30 IST2020-05-06T20:30:24+5:302020-05-06T20:30:53+5:30
समतानगर येथील दोघे आणि बिस्मिल्ला कॉलनीतील रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला.

CoronaVirus : औरंगाबादमध्ये तिघांनी कोरोनाचा विळखा तोडला; रुग्णालयातून मिळाली सुटी
औरंगाबाद : कोरोनाच्या विळख्यात ३ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. समतानगर येथील दोघे आणि बिस्मिल्ला कॉलनीतील रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे तिघांची रुग्णालयातून सुटी करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.
दरम्यान, औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या बुधवारी दुपारी ३५६ झाली. सकाळी २८ आणि दुपारी ७ असे ३५ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले. यात कबाडीपुरा येथे ५, दत्तनगर -कैलासनगर येथे ४, बजाजनगर येथील इंद्रप्रस्थ कॉलनी येथे एक, हक टॉवर, रेल्वेशेस्टेशन रोड येथे एक आणि कबीरनगर-उस्मानपुरा, सातारा रोड येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. यासह पूर्वी रुग्ण आढळून आलेल्या जयभीमनगर येथे ७, बायजीपुरा येथे ४ , संजयनगर-मुकुंदवाडी येथे ७, पुंडलीकनगर येथे ३ , बेगमपुरा येथे दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.