Coronavirus : धक्कादायक! 'कोरोना’बरोबर औरंगाबादेत ‘स्वाईन फ्लू’चा शिरकाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 00:47 IST2020-03-22T00:42:34+5:302020-03-22T00:47:10+5:30

Coronavirus : औरंगाबादेत एका प्राध्यापिकेला कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती.

Coronavirus: Shocking! Swine flu in Aurangabad with 'Corona' | Coronavirus : धक्कादायक! 'कोरोना’बरोबर औरंगाबादेत ‘स्वाईन फ्लू’चा शिरकाव

Coronavirus : धक्कादायक! 'कोरोना’बरोबर औरंगाबादेत ‘स्वाईन फ्लू’चा शिरकाव

औरंगाबाद : 'कोरोना’ बरोबर आता औरंगाबादेत ‘स्वाईन फ्लू’ने शिरकाव केल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या संशयावरून घेतलेल्या २१ पैकी दोघांना ‘स्वाईन फ्लू’ झाल्याचे समोर आले आहे.

औरंगाबादेत एका प्राध्यापिकेला कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करण्यात आली. ज्या व्यक्तींची प्रकृती खराब होती , त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्यातील 'एनआयव्ही' येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे सर्वांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले. मात्र दोघांना स्वाईन फ्लू झाल्याचे समोर आले आहे.

घाटीत स्वाईन फ्ल्यू पॉझिटिव्ह रुग्ण 
घाटीत मेडिसीन इमारतीत आयसोलेशन वार्डात एकाच स्वाईन फ्ल्यू रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या वार्डात चार संशयित रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. वाळूज सिडको महानगरातील ५८ वर्षीय व्यक्तीला गुरुवारी भरती करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तर दोघांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचेही ते म्हणाले

Web Title: Coronavirus: Shocking! Swine flu in Aurangabad with 'Corona'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.