Coronavirus : धक्कादायक; अधिष्ठातांच्या कार्यालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 11:58 IST2020-05-27T11:57:56+5:302020-05-27T11:58:24+5:30

संपर्कातील कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Coronavirus: shocking; The staff in the superintendent's office in Ghati Hospital is positive | Coronavirus : धक्कादायक; अधिष्ठातांच्या कार्यालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह

Coronavirus : धक्कादायक; अधिष्ठातांच्या कार्यालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठातांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

घाटी रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार होत आहे. तसेच उपचारासंदर्भात विविध नियोजन बैठका अधिष्ठाता कार्यालयात होतात. येथील कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती येताच या कर्मचाऱ्याच्या संपर्कातील इतर कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन तपासणी केली जात आहे. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात अनेक कर्मचारी, अभ्यागत आल्याची शक्यता आहे. संपर्कातील कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Coronavirus: shocking; The staff in the superintendent's office in Ghati Hospital is positive