CoronaVirus : धक्कादायक ! बायजीपुऱ्यातील कोरोनाग्रस्त मुलाची गरोदर आईसुद्धा पॉझिटिव्ह, किराडपुऱ्यातही एक रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 11:49 IST2020-04-16T11:46:10+5:302020-04-16T11:49:53+5:30

मंगळवारी सायंकाळी बायजीपुऱ्यातील १७ वर्षीय मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

CoronaVirus: Shocking! Pregnant mother of coronary tract child also positive, kiradpura also have one Corona patient | CoronaVirus : धक्कादायक ! बायजीपुऱ्यातील कोरोनाग्रस्त मुलाची गरोदर आईसुद्धा पॉझिटिव्ह, किराडपुऱ्यातही एक रुग्ण

CoronaVirus : धक्कादायक ! बायजीपुऱ्यातील कोरोनाग्रस्त मुलाची गरोदर आईसुद्धा पॉझिटिव्ह, किराडपुऱ्यातही एक रुग्ण

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : बायजीपुऱ्यातील १७ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह मुलाची गरोदर आईही पॉझिटिव्ह आढळून आली आहे. तर किराडपुरा येथे आणखी एक २२ वर्षीय पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी दिली.

मंगळवारी सायंकाळी बायजीपुऱ्यातील १७ वर्षीय मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. १० एप्रिल रोजी हा मुलगा आई-वडिलांसह शहरात आला. यानंतर बुधवारी मुलाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात आला. जिल्हा रुग्णालयात बायजीपुऱ्यातील ८ संशयितांचे स्वब तपासणीसाठी घेण्यात आले. त्यांचा अहवाल काय येतो, याकडे लक्ष लागले आहे. या १७ वर्षाच्या कोरोना पॉझिटिव्ह मुलाच्या वडिलांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आईचाही स्वॅब घेण्यात आलेला होता. हा अहवाल काय येतो, याकडे लक्ष लागले होते. अखेर हा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. तर किराडपुरा येथे आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील आणखी एकाला कोरोनाची बाधा झाली आहे.

Web Title: CoronaVirus: Shocking! Pregnant mother of coronary tract child also positive, kiradpura also have one Corona patient