CoronaVirus : औरंगाबादेत नव्या ठिकाणाहून आढळले रुग्ण; आणखी सात पॉझिटिव्हसह रुग्णसंख्या २१६
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 23:32 IST2020-05-01T23:30:31+5:302020-05-01T23:32:42+5:30
आज शहरात एकूण ३९ रुग्ण आढळून आले आहेत

CoronaVirus : औरंगाबादेत नव्या ठिकाणाहून आढळले रुग्ण; आणखी सात पॉझिटिव्हसह रुग्णसंख्या २१६
औरंगाबाद : शहरात नव्या भागात रुग्ण कोरोनाबाधित आढळून येत असल्याने चिंतेत वाढ झाली आहे. शुक्रवारी पहिल्या टप्प्यात 32 रुग्ण आढळले. त्यात आणखी 7 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बधितांची संख्या 216 वर पोहचली आहे.
नूर कॉलनी, असिफिया कॉलनी, एन 5 विजयश्री कॉलनी, किलेअर्क आणि जयभीमनगर येथील प्रत्येकी एक गुलाबवाडी पदमपुरा येथील 2 येथील रुग्णांचा समावेश आहे. तर दिवसभरात आढळलेल्या 39 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांत विजयश्री कॉलनी, भडकल गेट, महेमुदपुरा, वडगाव कोल्हाटी या नव्या भागांचा समावेश आहे. तर सर्वाधिक रुग्ण मुकुंदवाडी परिसरातील आहे. अशी माहिती अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी दिली.
संचारबंदी होणार कडक, विषम तारखेला शंभर टक्के बंद
आठ दिवसापासून शहरातील कोरोना संसर्ग रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे . हा संसर्ग रोखण्यासाठी १७ मे पर्यंत शहरातील जिवनावश्यक वस्तू ची खरेदी केवळ सम तारखेला सकाळी ७ ते ११ यावेळेत करता येईल . विषम तारखेला शंभर टक्के बंद राहणार आहे .