CoronaVirus News: औरंगाबादेतील ४ तालुक्यांनी मृत्युदरात राज्याला टाकले मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 04:30 IST2021-04-05T04:30:13+5:302021-04-05T04:30:40+5:30
ग्रामीण भागात आतापर्यंत ५१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील १४१ रुग्णांचा गेल्या महिनाभरातच कोरोनाने बळी घेतला. जिल्ह्यातील फुलंब्री, कन्नड, खुलताबाद आणि सिल्लोड या चार तालुक्यांमध्ये मृत्युचे प्रमाण अधिक आहे.

CoronaVirus News: औरंगाबादेतील ४ तालुक्यांनी मृत्युदरात राज्याला टाकले मागे
औरंगाबाद : जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी फुलंब्री, कन्नड, खुलताबाद आणि सिल्लोड या ४ तालुक्यांनी मृत्युदरात राज्यालाही मागे टाकले. या चारही तालुक्यांचा मृत्युदर औरंगाबाद जिल्हा आणि राज्यापेक्षाही अधिक आहे. या चारही तालुक्यांतील मृत्युदर कमी करण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे उभे राहिले आहे.
ग्रामीण भागात आतापर्यंत ५१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील १४१ रुग्णांचा गेल्या महिनाभरातच कोरोनाने बळी घेतला. जिल्ह्यातील फुलंब्री, कन्नड, खुलताबाद आणि सिल्लोड या चार तालुक्यांमध्ये मृत्युचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागांतील कोरोना स्थिती नियंत्रणात राहण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक ४.१ टक्के एवढा मृत्युदर हा खुलताबाद तालुक्याचा असून औरंगाबाद तालुक्यात सर्वात कमी १ टक्के एवढा मृत्युदर आहे. ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या महिनाभरापूर्वी १६ हजार ७०७ होती.
असा आहे मृत्युदर
राज्य २.६ टक्के
औरंगाबाद जिल्हा २.३ टक्के
खुलताबाद ४.१ टक्के
सिल्लोड ३.७ टक्के
फुलंब्री ३.४ टक्के
कन्नड ३.० टक्के