coronavirus : औरंगाबादेत कोरोनामुळे शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 18:51 IST2020-07-07T15:03:03+5:302020-07-07T18:51:01+5:30
शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते

coronavirus : औरंगाबादेत कोरोनामुळे शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू
औरंगाबाद : कोरोनामुळे शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी मृत्यू झाला. मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी यास दुजोरा दिला.
कोरोनाने शहरातील लोकप्रतिनिधींनाही विळखा घातला आहे. शहरातील सेनेच्या एका माजी नगरसेवकांना उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने ते व्हेंटिलेटरवर होते. दरम्यान, उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनासह त्यांना इतरही आजार होता. त्यांच्या संपर्कातील लोकांचीही तपासणी करण्यात आल्याचे डॉ.नीता पाडळकर यांनी सांगितले.
शहरात चार वर्षीय बाधित बालकाचा मृत्यू
घाटी रुग्णालयात ३ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यात आतापर्यंतच्या सर्वात कमी ४ वर्ष वयाच्या बाधित बालकाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३२१ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.