coronavirus : औरंगाबादेत आणखी पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 19:08 IST2020-06-27T19:07:59+5:302020-06-27T19:08:46+5:30
सध्या २११२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

coronavirus : औरंगाबादेत आणखी पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात गोंदी, अंबड ( जि. जालना) येथील एका रुग्णाचा आणि औरंगाबादेतील ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे मयत पावलेल्या रुग्णांची संख्या ३३८ झाली आहे.
भोईवाडा येथील ६६ वर्षीय पुरुष, बजाजनगर येथील ५७ वर्षीय पुरुष, संजयनगर- बायजीपुरा येथील २७ वर्षीय महिला आणि संजयनगर- बायजीपुरा येथीलच ५८ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. तसेच गोंदी, अंबड ( जि. जालना) येथील ५५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली. संजयनगर- बायजीपुरा एकाच दिवशी दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त होत आहे.
सलग चौथ्या दिवशी २०० बाधितांची वाढ
औरंगाबाद जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी शनिवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येने द्विशतक पार केले. जिल्ह्यात सकाळी तब्बल २०१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात १२५ रुग्ण मनपा हद्दीतील आणि ७६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४७२३ कोरोनाबाधित आढळले असून, यातील २३७३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर २३८ रुग्णांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या २११२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.