Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधित मृतांचा आकडा ४०४ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 14:54 IST2020-07-21T14:52:27+5:302020-07-21T14:54:27+5:30

जिल्ह्यातील चार बाधितांसह बुलडाणा जिल्ह्यातील एकाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Coronavirus: death of five coronavirus patients; total deaths in Aurangabad district 404 | Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधित मृतांचा आकडा ४०४ वर

Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधित मृतांचा आकडा ४०४ वर

औरंगाबाद : पाच कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी घाटी रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. यात बुलढाणा जिल्ह्यातील एका रुग्णासह औरंगाबाद जिल्ह्यातील चार रुग्णांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतचा मृतांचा आकडा ४०४ झाला आहे.

जिल्ह्यातील चार बाधितांसह बुलडाणा जिल्ह्यातील एकाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. न्याय नगर येथील ५१ वर्षीय महिला, पडेगाव येथील ८३ वर्षीय वृद्ध, चेतना नगर हर्सूल येथील ७० वर्षीय महिला, देवगाव रंगारी येथील ६५ वर्षीय महिला व बुलडाणा जिल्ह्यतील देऊळगाव राजा येथील ३८ वर्षीय पुरुषाचा मृतात समावेश असून जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृत्यूचा आकडा ४०४ झाला आहे.

आज १७९ बाधितांची वाढ

जिल्ह्यातील १७९ रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. यात शहरातील १२३, ग्रामीण भागातील ४६ तर शहर प्रवेशवेळी दहा जण बाधीत आढळले. आतापर्यंत ११ हजार ४२० कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ६३०० बाधीत बरे झाले, ४०० जणांचा मृत्यू झाला. तर ४७२० जणांवर उपचार सुरु आहेत. 

Web Title: Coronavirus: death of five coronavirus patients; total deaths in Aurangabad district 404