Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णसंख्या १२ हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 11:40 PM2020-07-22T23:40:15+5:302020-07-22T23:40:48+5:30

बुधवारी ३५९ नवे पॉझिटिव्ह रूग्ण : ७ रुग्णांचा मृत्यू

Coronavirus: crossed 12,000 patients in Aurangabad district | Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णसंख्या १२ हजार पार

Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णसंख्या १२ हजार पार

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात ४ हजार ९२१ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ३५९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील एकूण रूग्णसंख्येने १२ हजारांचा आकडा पार केला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १२ हजार २५ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ६, ६९० रूग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ४१४ जणांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला जिल्ह्यात ४, ९२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

शहरातील रामनगर येथील ४२ वर्षीय पुरुष, शिवनेरी कॉलनीतील ६५ वर्षीय पुरुष , उमाजी कॉलनीतील ६५ वर्षीय महिला आणि पडेगाव येथील ५५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने बुधवारी दिली. खासगी रुग्णालयात कन्नड तालुक्यातील टिळकनगरातील ७८ वर्षीय पुरूष, बालाजीनगरातील ७२ आणि जुना बाजार येथील ६४ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

मनपा हद्दीतील रूग्ण
जवाहर कॉलनी ४, साईनगर, सातारा परिसर १, मोतीवालानगर १, एमजीएम हॉस्टेल परिसर १, टाऊन सेंटर १, एन सहा संभाजी कॉलनी ३, इंदिरानगर, गारखेडा १, एन सात १, म्हाडा कॉलनी, पीर बाजार १, बिस्म‍िल्ला कॉलनी ५, स्वामी विवेकानंदनगर १, क्रांतीनगर २, बन्सीलालनगर २, न्यू नंदनवन कॉलनी १, छावणी १, पद्मपुरा १, तथागत नगर १, रामनगर १, इंदिरानगर, गारखेडा ४, आंबेडकरनगर ३, ब्रिजवाडी २, शिवाजीनगर ६, कासलीवाल तारांगण परिसर,पडेगाव १, शिवाजीनगर,गारखेडा १, जवाहर कॉलनी १, नारेगाव २, पन्नालालनगर १, रोशन गेट १, अल्तमश कॉलनी, सेंट्रल नाका १, हर्सुल १, भक्तीनगर, पिसादेवी रोड १, गारखेडा १, चिकलठाणा १, पद्मपुरा २, छावणी परिसर १ 

ग्रामीण भागातील रुग्ण 
औरंगाबाद १३, पैठण ५, हनुमान नगर, रांजणगाव १, चिंचोली लिंबाजी, कन्नड १, साकळी बु. १, सूर्यवंशीनगर, बजाजनगर १, श्रीरामनगर, बजाजनगर २, वडगाव कोल्हाटी १, खतखेडा, कन्नड १, रांजणगाव, गंगापूर १, महेबुबखेडा ३, पंचशीलनगर, वैजापूर ५, जीवनगंगा,वैजापूर १, वाळूज १, समतानगर, सिल्लोड १, औरंगाबाद १३, फुलंब्री ३, गंगापूर २४, खुलताबाद १, वैजापूर ५६, पैठण ९ 

सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण
 रांजणगाव ५, सिडको महानगर २, पैठण १, गारखेडा १, चित्तेगाव ४, अजिंठा १, समृद्धी महामार्ग कर्मचारी १, रामचंद्रनगर १, वाळूज २, बजाजनगर ४, रांजणगाव २ , वडगाव १, , उस्मानपुरा १, शिवाजीनगर २, अन्य ३

Web Title: Coronavirus: crossed 12,000 patients in Aurangabad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.