coronavirus : कोरोना नियमांचे उल्लंघन करून वाढदिवस साजरा करणारे माजी महापौर नंदकुमार घोडेलेविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 13:02 IST2021-05-07T13:02:06+5:302021-05-07T13:02:36+5:30
coronavirus : इटखेडा येथे त्यांच्या वॉर्डातील नागरिकांच्या उपस्थितीत त्यांनी रात्री ८ वाजता केक कापून वाढदिवस साजरा केला.

coronavirus : कोरोना नियमांचे उल्लंघन करून वाढदिवस साजरा करणारे माजी महापौर नंदकुमार घोडेलेविरुध्द गुन्हा
औरंगाबाद: कोविड नियमांचे उल्लंघन करून वाढदिवस साजरा करणारे माजी महापौर नंदकुमार घोडेलेंसह त्यांच्या २५ समर्थकाविरुद्ध सातारा पोलिसांनी गुरुवारी रात्री गुन्हा नोंदविला.
माजी महापौर घोडेले यांचा ४ मे रोजी वाढदिवस होता. इटखेडा येथे त्यांच्या वॉर्डातील नागरिकांच्या उपस्थितीत त्यांनी रात्री ८ वाजता केक कापून वाढदिवस साजरा केला. याविषयी पोलिसांना गुरूवारी माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नलावडे यांनी सरकारतर्फे घोडेले ( रा. साईवृंदावन काॅलनी, पैठण रोड) आणि त्यांच्या २५ ते ३० समर्थकांविरुध्द तक्रार नोंदविली. विनामास्क वाढदिवसाचा जल्लोष करणे, कोविड संसर्गाचा प्रसार करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे आणि अन्य कलमांनुसार सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.