coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचे बळी शंभरी पार; आणखी तीन बाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 13:59 IST2020-06-07T13:55:52+5:302020-06-07T13:59:42+5:30
शहरात आतापर्यंत १०२ जणांचा मृत्यू

coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचे बळी शंभरी पार; आणखी तीन बाधितांचा मृत्यू
ठळक मुद्देआणखी तिघांचा मृत्यू
औरंगाबाद : कोरोनाच्या बळींच्या संख्येने रविवारी शंभरी पार केली. एमजीएम रूग्णालयात उपचार सुरू असताना ३ रुग्णांचा मृत्यू झाला. औरंगाबादेत एकूण मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या १०२ झाली आहे.
अल्तमश कॉलनी येथील ७० वर्षीय पुरुष, देवडी बाजार येथील ६० वर्षीय महिला आणि कैलासनगर येथील ५६ वर्षीय महिलेचा एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अल्तमश कॉलनी येथील रुग्णाचा ६ जून रोजी रात्री ११ वाजता, देवडी बाजार येथील रुग्णाचा ७ जून रोजी पहाटे ३.१५ वाजता आणि कैलासनगर येथील रुग्णाचा ६ जून रोजी रात्री ९.३० वाजता मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.