CoronaVirus In Aurangabad : धक्कादायक ! औरंगाबादमध्ये सात वर्षीय मुलीला कोरोना; एकाच दिवसात पाच पॉझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 14:17 IST2020-04-05T13:22:07+5:302020-04-05T14:17:25+5:30
मुलीसह पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

CoronaVirus In Aurangabad : धक्कादायक ! औरंगाबादमध्ये सात वर्षीय मुलीला कोरोना; एकाच दिवसात पाच पॉझिटिव्ह रुग्ण
औरंगाबाद : शहरातील पाच जणांचे कोरोना अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे शहराला कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. यासोबतच शहरात आधीचे दोन आणि रविवारी पुढे आलेले पाच असे एकूण सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
घाटी रुग्णालयात सिव्हिटीएस इमारतीत शुक्रवारपासून उपचार घेत असलेल्या दोघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात हिमायतनगर, जलाल कॉलनी ७९ वर्षीय आणि सातारा परिसरातील ५२ वर्षीय रुग्णाचा समावेश आहे.
जिल्हा रुग्णालयात दाखल दोन कोरोना संशयित रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे घाटी प्रयोगशाळेने संकेत शनिवारी रात्री उशिरा दिले होते.
या दोघांत आरेफ कॉलनीतील एका ४५ वर्षीय महिलेचा आणि बीड बायपास परिसरातील एका ३८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यामुळे या दोघांवर पॉझिटिव्ह रुग्णांवर केले जाणारे उपचार सुरू करण्यात होते. या दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर खाजगी रुग्णालयात दाखल सात वर्षाची मुलगीही कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.