शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

Coronavirus In Aurangabad : लॉकडाऊन काळात शहरात हजार कोटींचा व्यापार होणार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 8:04 PM

कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे व्यवहार दोन वर्षे पाठीमागे गेल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

ठळक मुद्देकामगारांचे वेतन, वीज बिल, दुकान भाडे भरण्याचाही  निर्माण होईल प्रश्न पुन्हा लॉकडाऊनमुळे छोटे व्यापारी येणार अडचणीत  

औरंगाबाद : शहरात १० ते १८ जुलैदरम्यान शहरात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याने या ९ दिवसांच्या काळात शहरातील व्यापाऱ्यांचा सुमारे  ८०० ते एक हजार कोटी रुपयांचा व्यापार ठप्प होणार आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे व्यवहार दोन वर्षे पाठीमागे गेल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

शहरात किराणा दुकाने वगळता अन्य व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक छोटे व्यापारी दुकानांचे भाडेही भरू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. अनलॉकमध्ये दुकाने सुरू झाली. मात्र, पी-वन, पी-टूच्या नियमांचा फटका बसला. या परिस्थितीतही व्यापारी आपला व्यवसाय चालविण्याचा प्रयत्न करीत असतानाच आता १० जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याने त्याचा व्यापारी व्यवहारांवर मोठा परिणाम होणार आहे. कामगार, शेतकरी ते उद्योजकापर्यंत सर्वांना सवलती दिल्या गेल्या; पण व्यापाऱ्यांना सवलत जाहीर न झाल्याने त्यांच्यात  संताप व्यक्त करण्यात येत आहे. १८ जुलैनंतर व्यापार सुरळीत सुरू होण्यासाठी १५ दिवसांचा अवधी लागेल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे, तर काही व्यापाऱ्यांनी सांगितले की, मोठे व्यापारी तग धरून राहतील; पण लहान व्यापाऱ्यांना मात्र घरखर्च भागवणे कठीण जाणार आहे. बँकेचे कर्ज, दुकान भाडे, वीज बिल, कर्मचाऱ्यांचा पगार देणे कठीण जाईल. त्यांच्यासमोर मोठी आर्थिक समस्या निर्माण होईल. व्यापारी महसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, बाजारपेठ बंद राहणार असल्याने ९ दिवसांत ८०० ते एक हजार कोटींची उलाढाल ठप्प राहील. 

व्यापारी संघटनांचे पदाधिकारी म्हणतात...९ दिवसांच्या लॉकडाऊनचा पुढील १५ दिवस जाणवेल परिणामअनलॉकनंतर व्यवहार सुरळीत सुरू होण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले. आता कुठे कार व दुचाकीची विक्री वाढू लागली होती; पण पुन्हा लॉकडाऊन सुरू होणार आहे. ९ दिवस व्यवहार बंद राहणार आहे. पुन्हा व्यवहार पूर्ववत सुरू होण्यासाठी १५ दिवस लागतील. महिन्याची एकूण उलाढाल ५० टक्क्यांनी कमी होणार आहे. - राहुल पगरिया, अध्यक्ष, चेंबर आॅफ अर्थोराईज आटोमोबाईल डीलर्स असोसिएशन

व्यापाऱ्यांचे नुकसान होणार; पण भविष्याचेही नियोजन व्हावेमागील तीन महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये जिल्हा प्रशासनाने विलगीकरण कक्ष वाढवणे, व्हेंटिलेटरची व्यवस्था करणे, अपेक्षित होते. मात्र, नियोजन न झाल्याने त्याचा परिणाम शहरला भोगावा लागला, तसेच पोलिसांनी सुरुवातीच्या काळात कडक पाऊल उचलले नाही. या चुका टाळता आल्या असत्या; पण आता प्रशासनाला ९ दिवसांचा वेळ मिळत आहे. या काळात भविष्यातील वाढणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन नियोजन करावे. -लक्ष्मीनारायण राठी, महासचिव, जिल्हा व्यापारी महासंघ

मोंढा, जाधववाडीत ८० कोटींचे नुकसान९ दिवसांत मोंढा व जाधववाडी धान्याची बाजारपेठ मिळून ७० ते ८० कोटींचे नुकसान होणार आहे. सर्व व्यापाऱ्यांनी परराज्यातील धान्याच्या आॅर्डरी रद्द करणे सुरू केले आहे. जे मालट्रक ९ तारखेच्या आत येतील त्यातील माल उतरवून घेण्यात येणार आहे. -नीलेश सेठी, अध्यक्ष, जनरल किराणा मर्चंट असोसिएशन

हॉटेल, लॉजिंग बंद असल्याने परिणाम नाहीचहॉटेल, लॉजिंग बंदच आहे. आता सरकारने लॉजिंगला परवानगी दिली; पण विमानसेवा बंद, पर्यटनस्थळे बंद आहेत. कोरोनामुळे कोणी शहरात येण्यास तयार नाही. यामुळे पुन्हा लॉकडाऊन केले तरी हॉटेल, लॉजिंगवर विशेष परिणाम होणार नाही. - शिवाजी पाटील, अध्यक्ष, औरंगाबाद डिस्ट्रिक्ट हॉटेल, रेस्टॉरंट असोसिएशन

यापुढे लॉकडाऊन करणे परवडणार नाहीतीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतरही आता पुन्हा ९ दिवसांचा लॉकडाऊन करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे आम्ही व्यावसायिक उलाढालीत दोन वर्षे मागे पडलो आहोत. पुन्हा भरारी घेण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागेल. यामुळे यापुढे लॉकडाऊन करणे व्यापाऱ्यांना परवडणार नाही. -आनंद भारुका, अध्यक्ष, सिटीचौक, सराफा असोसिएशन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद