CoronaVirus : औरंगाबाद @ २९७ ; आणखी सहा पॉझिटिव्ह रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 17:30 IST2020-05-04T17:29:39+5:302020-05-04T17:30:08+5:30

सोमवारी सकाळी ८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता

CoronaVirus: Aurangabad @ 297; Addition of six corona positive patients | CoronaVirus : औरंगाबाद @ २९७ ; आणखी सहा पॉझिटिव्ह रुग्णांची भर

CoronaVirus : औरंगाबाद @ २९७ ; आणखी सहा पॉझिटिव्ह रुग्णांची भर

औरंगाबाद: औरंगाबादेत कोरोग्रस्तांची साखळी वाढतच आहे. सोमवारी सकाळी ८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. यानंतर दुपारी आणखी ६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात संजय नगर ४ , किलेअर्क, हुडको एन ११ येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. त्यामुळे शहरातील बाधित रुग्णांचा आकडा २९७ झाला आहे.


शहरात १५ मार्चला पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर गेल्या दिड महिन्यात ५३ रुग्ण होते. २७ एप्रिलपासून २९,२७,२१,४९,३९, ४०, २७, १४ अशी दर दिवशी अनुक्रमे वाढ झाली. शहरातील बाधितांची संख्या २७३ वर पोहचली. यातील दहा जणांचे मृत्यू झाले असुन २४ जण कोरोनामुक्त झाले. तर एक रुग्ण पुन्हा बाधित झाला. यात नव्या भागांतही बाधित आढळायला सुरुवात झाल्याने शहरवासीयांची चिंता वाढली आहे.

असे वाढले रुग्ण
२७ एप्रिल २९
२८ एप्रिल २७
२९ एप्रिल २१
३० एप्रिल ४७
१ मे ३९
२ मे ४०
३ मे २७
४ मे ८ + ६ 
--
२९७ एकुण कोरोना पॉझीटीव्ह
१० मृत्यू
२४ कोरोनामुक्त
०१ पुन्हा बाधित

Web Title: CoronaVirus: Aurangabad @ 297; Addition of six corona positive patients