coronavirus : औरंगाबादमध्ये संध्याकाळपर्यंत ८६ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ८३५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 16:50 IST2020-05-15T16:50:20+5:302020-05-15T16:50:40+5:30
शुक्रवारी सकाळी ७४ तर दुपारी ६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते.

coronavirus : औरंगाबादमध्ये संध्याकाळपर्यंत ८६ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ८३५
औरंगाबाद : शुक्रवारी दुपारपर्यंत ८० पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्यानंतर संध्याकाळी आणखी ६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे संध्याकाळपर्यंत रुग्णसंख्या ८६ तर गेली असून जिल्ह्यात एकुण बाधितांचा आकडा ८३५ झाला आहे.
शहरात सिडको एन ६ मध्ये २, बुढीलेन १, रोशन गेट १, संजय नगर १, सादात नगर १, भीमनगर भावसिंगपुरा २, वसुंधरा कॉलनी १, वृंदावन कॉलनी ३, न्याय नगर ७, कैलास नगर १, पुंडलिक नगर ८, सिल्क मील कॉलनी ७, हिमायत नगर ५, चाऊस कॉलनी ३, जुना मोंढा भवानी नगर ५, हुसेन कॉलनी १५, प्रकाश नगर १, शिव कॉलनी गल्ली नं. ५ पुंडलिक नगर १, हुसेन कॉलनी ६, रहेमानिया कॉलनी ४, बायजीपुरा ७, हनुमान नगर १, हुसेन नगर १, एन ८ -अमर सोसायटी १, न्यू हनुमान नगर गल्ली नं.१ दुर्गा माता मंदिर परिसरात १ असे ८६ रुग्ण आढळले आहेत.