Coronavirus : औरंगाबादेत ८५ वर्षीय बाधिताचा मृत्यू; आतापर्यंत ९० बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 13:49 IST2020-06-04T13:48:14+5:302020-06-04T13:49:45+5:30

रुग्णास तीव्र श्वसन विकार, न्यूमोनिया आणि हृदयविकाराचा त्रास होता

Coronavirus: 85-year-old dies in Aurangabad; 90 victims so far | Coronavirus : औरंगाबादेत ८५ वर्षीय बाधिताचा मृत्यू; आतापर्यंत ९० बळी

Coronavirus : औरंगाबादेत ८५ वर्षीय बाधिताचा मृत्यू; आतापर्यंत ९० बळी

औरंगाबाद : रोशनगेट परिसरातील ८५ वर्षीय कोरोनाबाधीत वृद्धाचा बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजता मृत्यू झाला.  ३० मे रोजी त्यांना भरती करण्यात आले होते. त्यांना तीव्र श्वसन विकार, न्यूमोनिया आणि हृदयविकाराचा त्रास असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने कळवले आहे. या मृत्यूमुळे आतापर्यंत एकूण मृतांचा आकडा ९० झाला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात गुरुवारी (दि. ४) सकाळी ६३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे बाधितांची एकुण संख्या १७६७ झाली आहे. यापैकी १११३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ५६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

गुरुवारी आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांत बेगमपुरा २, लेबर कॉलनी १, पडेगाव १, बायजीपुरा १, हर्सुल परिसर १, भारतमाता नगर १, संजय नगर, मुकुंदवाडी १, रोशन गेट २, देवळाई चौक परिसर १, समर्थ नगर १, शिवशंकर कॉलनी ५, शिवाजी कॉलनी १, सईदा कॉलनी १, चेतना नगर २, एन-सात सिडको १, एन-२ विठ्ठल नगर १, विनायक नगर, जवाहर कॉलनी १, बारी कॉलनी १, हनुमान नगर, गारखेडा १, मिल कॉर्नर १, एन चार १, क्रांती नगर १, विजय नगर, गारखेडा १, एन सहा संभाजी कॉलनी ६, अयोध्या नगर १, न्यू हनुमान नगर १, कैलास नगर १, अजिंक्य नगर, गारखेडा १, एन १ सिडको १, सुंदर नगर, पडेगाव १, गणेश कॉलनी २, एन ४ समृद्धी नगर सिडको २, कटकट गेट, नेहरू नगर १, आंबेडकर नगर, एन -७ येथील ३, जय भवानी नगर १, राजा बाजार ४, अन्य ६ या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २६ महिला आणि ३७ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: Coronavirus: 85-year-old dies in Aurangabad; 90 victims so far