coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा ६२ वा बळी; ६५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 10:41 IST2020-05-27T10:40:32+5:302020-05-27T10:41:16+5:30

खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू

coronavirus: 62nd death of coronavirus in Aurangabad; 65-year-old patient dies | coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा ६२ वा बळी; ६५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू

coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा ६२ वा बळी; ६५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू

औरंगाबाद : शहरातील मकसूद कॉलनीतील ६५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी मृत्यू झाला. यामुळे औरंगाबादेत आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ६२ झाली आहे.

या रुग्णाचा २० मे रोजी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. रुग्णालयात दाखल झाल्यापासून रूग्ण व्हेंटिलेटरवर होता. रुग्णाला पूर्वीपासून उच्च रक्तदाबाचा त्रास होता. उपचार सुरू असताना बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णाच्या मृत्यूचे कारण कोविड न्यूमोनिया आणि मल्टी ऑर्गन फेल्युअर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

Web Title: coronavirus: 62nd death of coronavirus in Aurangabad; 65-year-old patient dies