coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील ६ रुग्णांचा मृत्यू; एकूण कोरोना बळी ६२८ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 19:02 IST2020-08-22T19:02:02+5:302020-08-22T19:02:48+5:30
कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २०, १९० एवढी झाली आहे.

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील ६ रुग्णांचा मृत्यू; एकूण कोरोना बळी ६२८ वर
औरंगाबाद : घाटी रुग्णलयात उपचार सुरू असताना जिल्ह्यातील ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित मयत रुग्णांची संख्या ६२८ झाली आहे.
गारखेडा येथील ४५ वर्षीय पुरुष , माहेतपूर-औरंगाबाद येथील ४० वर्षीय पुरुष , यशवंतनगर-पैठण येथील ५० वर्षीय पुरुष, जिकठाण-गंगापूर येथील २९ वर्षीय महिला, एसटी कॉलनी, एन- २ येथील ७० वर्षीय पुरुष आणि अंदानेर- कन्नड येथील ७० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मयत रुग्णांची संख्या ६२८ झाली आहे.
आज १४६ कोरोनाबाधितांची वाढ
जिल्ह्यात शनिवारी सकाळी १४६ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २०, १९० एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५,१५२ रूग्ण बरे झाले तर ६२८ जणांचा मृत्यू झाल्याने सध्या ४४१० जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.