coronavirus : औरंगाबादेत कोरोनामुळे आणखी ६ मृत्यू; १३ बाधितांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 16:46 IST2020-06-11T16:44:51+5:302020-06-11T16:46:09+5:30
गुरुवारी दिवसभरात १४५ बाधितांची वाढ

coronavirus : औरंगाबादेत कोरोनामुळे आणखी ६ मृत्यू; १३ बाधितांची वाढ
ठळक मुद्देआतपर्यंत कोरोनाबळींची संख्या १२७ वर
औरंगाबाद : शहरातील बाधित ४ पुरुष व २ महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती गुरुवारी प्रशासनाने दिली. या सहा मृत्यूमुळे जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोनाबळींची संख्या १२७ झाली आहे. यासोबतच जिल्ह्यात सकाळी १३२ तर दुपारच्या सत्रात १३ अशी १४५ बाधितांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या २४२० झाली आहे.
दुपारी आढळून आलेले बाधित, वेदांत नगर १, एसआरपीएफ परिसर २, जिल्हा परिषद परिसर १, इटखेडा १, बजाज नगर १, साईनगर, पंढरपूर १, उत्तम नगर, जवाहर कॉलनी १, संजय नगर, बायजीपुरा २, शहागंज १, जटवाडा रोड १, अन्य १ या भागातील आहेत. यामध्ये १० पुरूष आणि ३ महिला रुग्णांचा समावेश आहे.