coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील ५ बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 17:30 IST2020-08-28T17:28:30+5:302020-08-28T17:30:18+5:30

कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २२,२६३ झाली आहे.

coronavirus: 5 corona infected people die in Aurangabad district | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील ५ बाधितांचा मृत्यू

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील ५ बाधितांचा मृत्यू

ठळक मुद्देजिल्ह्यातील १६,९७९ रुग्ण बरे झाले आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यातील ५ तर बीड येथील एका बाधिताचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ६७७ झाली आहे.

घाटी रुग्णालयात उपचार सुरु असताना छावणी येथील ४२ वर्षीय पुरुष, गोलटगाव येथील ३४ वर्षीय महिला, उल्कानगरी येथील ७८ वर्षीय पुरुष, दाइगाव लासुर स्टेशन येथील ५२ वर्षीय पुरुष, सातारा परिसर येथील ६४ वर्षीय महिला तर बीड येथील ७८ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. 

आज ७८ बाधितांची भर 
जिल्ह्यातील ७८ रुग्णांचे अहवाल शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २२,२६३ झाली आहे. त्यापैकी १६,९७९ बरे झाले तर ६७७ बाधितांचा आतापर्यत मृत्यू झाला आहे. सध्या ४६१२ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Web Title: coronavirus: 5 corona infected people die in Aurangabad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.