coronavirus : औरंगाबादमध्ये ४ बाधितांचा मृत्यू; एकूण कोरोना मृत्यूची संख्या ४५१ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 15:35 IST2020-07-28T15:34:30+5:302020-07-28T15:35:08+5:30
जिल्ह्यातील ६७ रुग्णांचे अहवाल मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आले.

coronavirus : औरंगाबादमध्ये ४ बाधितांचा मृत्यू; एकूण कोरोना मृत्यूची संख्या ४५१ वर
औरंगाबाद : जिल्ह्यातील ३ आणि गेवराई (जि. बीड) येथील बाधीत रुग्णांचा घाटी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत मृत्यूची संख्या ४५१ झाली आहे.
आंबेडकर नगर येथील ३१ वर्षीय पुरुष, रोझा बाग येथील ६५ वर्षीय महिला, कन्नड तालुक्यातील आडगाव येथील ६० वर्षीय पुरुष, मोमीनपुरा गेवराई येथील १०० वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे झालेल्या मृत्यूत समावेश आहे.
आज ६७ रुग्णांची वाढ
जिल्ह्यातील ६७ रुग्णांचे अहवाल मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १३,३१९ वर गेला आहे. त्यापैकी ८९५३ कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यटन ४५१ जणांचा मृत्यू झाला असून सध्या ३९१७ जणांवर उपचार सुरु आहेत.