CoronaVirus : औरंगाबादमध्ये आणखी २८ जण पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या @३४९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 08:51 IST2020-05-06T08:50:43+5:302020-05-06T08:51:17+5:30
नवीन ठिकाणांतून रुग्ण आढळल्याने चिंतेत वाढ

CoronaVirus : औरंगाबादमध्ये आणखी २८ जण पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या @३४९
औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा उद्रेक वाढतच आहे. शहरात बुधवारी सकाळी तब्बल २८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३४९ झाली आहे.
जयभीम नगर (05), कबाडीपुरा (05), दत्त नगर-कैलास नगर (04), बायजीपुरा (04), संजय नगर, मुकुंदवाडी (03), पुंडलिक नगर (03), बेगमपुरा (01), रेल्वे स्टेशन परिसर (01), कबीर नगर, उस्मानपुरा, सातारा रोड (01) या परिसरातील आहेत. तर ग्रामीण भागातील इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर, एमआयडीसी येथील एका महिला रुग्णांचा समावेश असल्याची माहिती आहे.