Coronavirus : अब तक २५६ ! औरंगाबाद कोरोनाच्या मगरमिठीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 23:33 IST2020-05-02T23:33:25+5:302020-05-02T23:33:56+5:30
आज तब्बल ४० रुग्णांची नोंद

Coronavirus : अब तक २५६ ! औरंगाबाद कोरोनाच्या मगरमिठीत
औरंगाबाद : शहराभोवती कोरोनाची मगरमिठी आता घट्ट होत आहे. शनिवारी संध्याकाळी पर्यंत २८ आणि रात्री उशिरा आणखी १२ पॉझिटिव्हसह दिवसभरात तब्बल ४० नेे रुग्णसंख्या वाढुन ५६ वर गेली आहे. १२ रुग्णत ११ जय भीम नगर व १ नंदनवन कॉलनी येथील रुग्ण आहेत.
शहरात १५ मार्चला पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर गेल्या दिड महिन्यात ५३ रुग्ण होते. २७ एप्रिलपासून २९,२७,२१,४७,३९, ४० अशी दर दिवशी अनुक्रमे वाढ झाली. केवळ या सहा दिवसांत २१६ रुग्णांची भर पडली. शहरातील बाधितांची संख्या २५६ वर पोहचली. यातील नऊ जणांचे मृत्यू झाले असुन २४ जण कोरोनामुक्त झाले. तर एक रुग्ण पुन्हा बाधित झाला. यात नव्या भागांतही बाधित आढळायला सुरुवात झाल्याने शहरवासीयांची चिंता वाढली आहे.
असे वाढले रुग्ण
२७ एप्रिल २९
२८ एप्रिल २७
२९ एप्रिल २१
३० एप्रिल ४७
१ मे ३९
२ मे ४०
--
२५६ एकुण कोरोना पॉझीटीव्ह
०९ मृत्यू
२४ कोरोनामुक्त
०१ पुन्हा बाधित