coronavirus : औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या पंधराशेच्या उंबरठ्यावर; आणखी ११ बाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:22 IST2020-05-30T23:22:17+5:302020-05-30T23:22:45+5:30
४४५ रुग्णांवर उपचार सुरू असून ९८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले

coronavirus : औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या पंधराशेच्या उंबरठ्यावर; आणखी ११ बाधितांची भर
औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी सकाळी २८ बाधितांची वाढ झाल्यानंतर रात्री आणखी ११ बाधितांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १४९८ वर गेला आहे. यात ४४५ रुग्णांवर उपचार सुरू असून ९८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
संजय नगर १, मुजिब कॉलनी, रोशन गेट १, कटकट गेट, नेहरू नगर १, वसंत नगर, जवाहर कॉलनी १, रेहमानिया कॉलनी, गल्ली नं.बारा १, मिसरवाडी १, समता नगर १, एन आठ, सिडको १, वैजापूर २ असे एकूण ११ रुग्ण रात्री वाढले. यामुळे दिवसभरात ३९ बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. यासोबतच ३० रुग्णांना सुटी देण्यात आली आहे.