शहरं
Join us  
Trending Stories
1
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
2
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
3
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
4
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
5
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
6
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
7
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
8
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
9
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
10
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
11
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
12
अमित शहा फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
13
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
14
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
15
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
16
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
17
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
18
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
19
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
20
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?

corona virus : औरंगाबाद महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड रुग्णालयातून ४८ रेमडेसिविर इंजेक्शन्सची चोरी ; ५ कर्मचाऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 4:59 PM

48 remedicivir missing from Aurangabad Municipal Corporation's Meltron Covid Hospital रेमडेसिविर इंजेक्शनचा तुडवडा असण्याच्या काळात या बॉक्समधील तबल ४८ वाईल गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे महापालिकेने पाच कर्मचाऱ्यांना नोटीस दिली आहे. गरज पडली तर एफआयआर सुद्धा दाखल करण्यात येईल

औरंगाबाद : महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड रुग्णालयात पाठविण्यात आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या एका एक बॉक्सची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. या बॉक्समध्ये ४८ रेमडेसिविर इंजेक्शन होती. या प्रकरणाची महापालिकेने चौकशी सुरू केली असून ५ कर्मचाऱ्यांना नोटीस दिली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने, आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

महापालिकेचे चिखलठाणा परिसरात मेल्ट्रॉन कोविड रुग्णालय आहे. या रुग्णालयात २०  एप्रिल रोजी रेमडेसिविर इंजेक्शनची २६ बॉक्स भवानी नगर येथील महापालिकेच्या स्टोअर रूममधून पाठविण्यात आले होते. यातील प्रत्येक बॉक्समध्ये ४८ वाईल होते. एप्रिल २३ रोजी मेल्ट्रॉन रुग्णालयात प्राप्त झालेल्या इंजेक्शनची तपासणी करण्यात आली. यावेळी प्राप्त झालेल्या २६ बॉक्स पैक्की एका बॉक्समध्ये रेमडेसिविर ऐवजी एमपीएस  हे दुसरेच इंजेक्शन निघाले. रेमडेसिविर इंजेक्शनचा तुडवडा असण्याच्या काळात या बॉक्समधील तबल ४८ वाईल चोरीस गेल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणाची महापालिकेने गंभीर दखल घेऊन चौकशी सुरु केली आहे. महापालिकेने पाच कर्मचाऱ्यांना नोटीस दिली आहे. तसेच गरज पडली तर  एफआयआर सुद्धा दाखल करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने, आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

रुग्णालयात दररोज ३०० इंजेक्शन्सचा वापर मागील महिन्यात महापालिकेने मेलट्रोन हॉस्पिटलमधील कोविड रुग्णांसाठी थेट कंपनीकडून १० हजार रेमडेसिविर खरेदी केले होते. यानंतर अवघ्या १० ते १२ दिवसांत तब्बल ४ हजार इंजेक्शन्सचा वापर करण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली. ३५० रुग्ण क्षमता असलेल्या रुग्णालयात दररोज ३०० इंजेक्शन्सचा वापर होत असल्याचे पुढे आले होते. इंजेक्शन वापराचे प्रमाण ८५ टक्के ऐवढे असून वापरलेल्या इंजेक्शनचे वाईल सुद्धा रुग्णालयात उपलब्ध नाहीत. यामुळेच रुग्णालयात रेमडेसिविरचा काळाबाजार होत असल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या