CoronaVirus : धक्कादायक ! औरंगाबादेत कोरोनाचा १४ वा बळी, ८० वर्षीय रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 08:42 IST2020-05-11T08:39:07+5:302020-05-11T08:42:36+5:30

८० वर्षीय रुग्णाचा रात्री १.१० वाजेच्या सुमारास मृत्यू

Corona Virus: shocking ! 14th death of Corona in Aurangabad, 80-year-old patient dies | CoronaVirus : धक्कादायक ! औरंगाबादेत कोरोनाचा १४ वा बळी, ८० वर्षीय रुग्णाचा मृत्यू

CoronaVirus : धक्कादायक ! औरंगाबादेत कोरोनाचा १४ वा बळी, ८० वर्षीय रुग्णाचा मृत्यू

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा १४ वा बळी गेला. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना रामनगर-मुकुंदवाडी येथील ८० वर्षीय रुग्णाचा रात्री १.१० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

सदर रुग्णावर घाटीत ८ मे पासून उपचार सुरू होते. ९ मे रोजी या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने १० मे पासून ते व्हेंटिलेटरवर होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शहरातील हा कोरोनाचा १४ मृत्यु आहे.

Web Title: Corona Virus: shocking ! 14th death of Corona in Aurangabad, 80-year-old patient dies