Corona Virus: 'धोका वाढतोय; काळजी हवीच'; कोरोना रुग्णसंख्या पुन्हा पोहोचली शंभरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 12:07 PM2021-06-25T12:07:24+5:302021-06-25T12:09:19+5:30

Corona Virus: जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४५ हजार ७८१ एवढी झाली आहे. आतापर्यंत एक लाख ४१ हजार ४७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Corona Virus: 'Risk is increasing; Need care '; The number of corona patients reached hundreds again | Corona Virus: 'धोका वाढतोय; काळजी हवीच'; कोरोना रुग्णसंख्या पुन्हा पोहोचली शंभरावर

Corona Virus: 'धोका वाढतोय; काळजी हवीच'; कोरोना रुग्णसंख्या पुन्हा पोहोचली शंभरावर

googlenewsNext
ठळक मुद्देगुरुवारी शहरात २६, तर ग्रामीण भागात ८९ नवे रुग्ण आढळले. जिल्ह्यात सक्रिय रुग्णही वाढले असून सध्या ९०५ जणांवर सुरू उपचार आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा शंभरावर गेली. दिवसभरात ११५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यामुळे कोरोनाचा धोका संपलेला नसून काळजी हवीच, असे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे. गुरुवारी शहरात २६, तर ग्रामीण भागात ८९ नवे रुग्ण आढळले. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होत होती. परंतु गुरुवारी त्यात बरीच वाढ झाली. जिल्ह्यात सध्या ९०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४५ हजार ७८१ एवढी झाली आहे. आतापर्यंत एक लाख ४१ हजार ४७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील २० आणि ग्रामीण भागातील ८०, अशा १०० रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना गारखेडा परिसरातील ४५ वर्षीय पुरुष, शेवता, पैठण येथील ४० वर्षीय महिला आणि जालना जिल्ह्यातील ८१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण
औरंगाबाद १, जुना बाजार १, मोंढा नाका १, सिंधी कॉलनी १, एन-५ येथे १, लालबाग १, पुंडलिकनगर १, पद्मपुरा १, चिकलठाणा ३, छावणी १, एन-१२ येथे १, डीकेएमएम हॉस्पिटल २, टी. व्ही. सेंटर १, भगतसिंगनगर १, रेल्वेस्टेशन १, शिवाजीनगर १, अन्य ७

ग्रामीण भागांतील रुग्ण
रांजणगाव ४, शेवगाव १, पिंपळगाव, ता. सिल्लोड १, यशवंतनगर, ता. पैठण १, एन-९ येथे १, पैठण २, अन्य ७९

Web Title: Corona Virus: 'Risk is increasing; Need care '; The number of corona patients reached hundreds again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.