corona virus : औरंगाबादेत कोरोनाचा शिरकाव; एक संशयित तर चारजणांना निरीक्षणाखाली ठेवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 19:38 IST2020-03-11T19:22:28+5:302020-03-11T19:38:02+5:30
दुबई आणि इटली येथून परतल्यांची तपासणी

corona virus : औरंगाबादेत कोरोनाचा शिरकाव; एक संशयित तर चारजणांना निरीक्षणाखाली ठेवले
औरंगाबाद : राज्यात पुणे आणि मुंबईनंतर औरंगाबादमध्येही कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे. परदेशातून परतलेल्या चारजणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली असता खबरदारी म्हणून घरी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेश येथून आलेल्या एका १६ वर्षीय संशयित रुग्णाला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
जगभर थैमान घालत असलेला कोरोना व्हायरसचे राज्यात रुग्ण आढळून आली आहेत. पुणे नंतर कोरोना व्हायरसने शहरात धडक दिली आहे. दुबई आणि इटली येथून परतलेल्या चार जणांची जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. यात एकाही व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत. तरीही या चार जणांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
दरम्यान, एका १६ वर्षीय संशयित रुग्णास कोठे भरती करायचे यावर जिल्हा रुग्णालय आणि शासकीय रुग्णालय घाटी यामध्ये मतभेद समोर आले आहेत.