Corona Virus in Aurangabad : सिल्लोड तालुक्यात बाहेरून आलेले 1500 नागरिक होम क्वारंटाईन; संशयित नाहीत मात्र खबरदारीसाठी उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 18:32 IST2020-03-26T18:31:04+5:302020-03-26T18:32:14+5:30
एकही संशयीत नाही मात्र..खबरदारीसाठी आरोग्य विभागाची उपाययोजना

Corona Virus in Aurangabad : सिल्लोड तालुक्यात बाहेरून आलेले 1500 नागरिक होम क्वारंटाईन; संशयित नाहीत मात्र खबरदारीसाठी उपाययोजना
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड : तालुक्यात परजिल्ह्यातून आलेले 1500 नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सिल्लोड तालुक्यात एकही संशयीत कोरोना रुग्ण आढळला नाही मात्र , खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर जिल्ह्यातून व पुणे, मुंबई, चिंचवड येथून आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईनमध्ये राहण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी रेखा भंडारे यांनी लोकमतला दिली.
सिल्लोड तालुक्यातील अंधारी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 93, आमठाना 494, उंडनगाव 194, पानवडोद 214, शिवना 303, पालोद 202, असे विविध प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावातील 1500 नागरिकांना आरोग्य विभागाने हातावर शिक्के मारून होम क्वारंटाईन मध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे.
तालुक्यातील वरील 6 प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचारी याना दक्ष राहून त्यां रुग्णांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. सिल्लोड तालुक्यात परजिल्ह्यातील 1476 नागरिक दाखल असे वृत्त लोकमत ने प्रकाशित केले होते त्या आधारे आरोग्य विभागाने दखल घेऊन घरो घरी जावून त्यां रुग्णांची कौंसलींग करून त्यांना घरातच विलगिकरन करून घेण्याच्या सूचना दिल्या.त्याच प्रमाणे कुणाला कोरोना चे लक्षण दिसल्यास त्यानी लगेच जवळच्या आरोग्य केंद्राला माहिती देवून औंरगाबाद येथील जिल्हा रुग्णालयात तपासणी करून घ्यावी अशा सूचना आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्या नागरिकांना दिल्या आहेेेत.