शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

corona virus : औरंगाबादच्या सर्व सीमा बंद; जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी काही तासांत मिळेल ई-पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 3:05 PM

corona virus : शहर पोलीस प्रशासनाकडे महत्त्वाच्या कारणासह आणि आवश्यक त्या दोन कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करणे गरजेचा आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात येणाऱ्या सर्व मार्गांवरील जिल्हा प्रवेश सीमांवर तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये ई-पासविना जाता येईल. परंतु त्यासाठी ठोस कारण असणे गरजेचे आहे.

औरंगाबाद : नातेवाइकांच्या अंत्यविधीकरिता अथवा वैद्यकीय कारणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात, परराज्यात जाण्यासाठी आवश्यक असणारा ई-पास ऑनलाइन अर्ज केल्यावर अवघ्या काही तासांत मिळू शकेल. शहर पोलीस प्रशासनाकडे महत्त्वाच्या कारणासह आणि आवश्यक त्या दोन कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करणे गरजेचा आहे.

पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, बीड, जालन्याकडून जिल्ह्यात येणाऱ्या सर्व मार्गांवरील जिल्हा प्रवेश सीमांवर तपासणी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३० एप्रिलपर्यंत असलेल्या लॉकडाऊनमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात पोलीस आयुक्त आणि ग्रामीण भागात पोलीस अधीक्षकांवर याची जबाबदारी असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये ई-पासविना जाता येईल. परंतु त्यासाठी ठोस कारण असणे गरजेचे आहे. कुणालाही जाता येणार नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. इतर जिल्ह्यातून कुणी शहरात आलेले असेल तर त्यांना जाता येणार नाही.

जिल्ह्याच्या सर्व सीमा बंदइतर जिल्ह्यातून येणारे सर्व मार्ग बंद केले असून, जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आलेल्या आहेत. तेथे चेकपोस्ट सुरू करण्यात आले आहेत. बाहेरून येणाऱ्या वाहनांतील प्रवाशांची चेकपोस्टवरच अ‍ॅण्टिजन टेस्ट करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्यावर्षी दिले दीड लाख ई-पासजिल्हा प्रशासनाने २१ एप्रिल २०२० ते १० ऑगस्ट २०२० या काळात १ लाख ३९ हजार ७८४ नागरिकांना जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई-पास मंजूर केले होते. प्रशासनाकडून दररोज अंदाजे दीड हजार ई-पास मंजूर करून देण्यात येत होते. तर ४८ हजार २८२ अर्ज विविध कारणांमुळे नाकारले होते.

कोणाला मिळू शकेल ई-पासनातेवाइकांचा अंत्यविधी, वैद्यकीय आणि लग्न समारंभ यासारख्या महत्त्वाच्या कारणासाठी परजिल्ह्यात अथवा पर राज्यात जाण्यासाठी ई-पास दिला जाईल.

ई-पास काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे.- अर्जदार आजारी नसल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र.- प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या आधार कार्डाची प्रत.

ई-पाससाठी या संकेतस्थळावर करा ऑनलाइन अर्ज : covid19.mhpolice.in

या संकेतस्थळावरील असा फॉर्म भरा : - तुमचा जिल्हा / शहर निवडा- संपूर्ण नाव नमूद करा- प्रवास आरंभ करण्याची तारीख नमूद करा- परतीच्या प्रवासाची अंतिम तारीख नमूद करा- मोबाइल क्रमांक नमूद करा- प्रवासाचे कारण (पर्याय निवडा)- प्रवासाच्या वाहनाचा पर्याय निवडा- वाहन क्रमांक नमूद करा- विद्यमान राहण्याचा पत्ता नमूद करा- ई-मेल आयडी नमूद करा- प्रवासाचे आरंभ ठिकाण निवडा- अंतिम प्रवासाचा जिल्हा पर्याय निवडा- प्रवासाच्या अंतिम ठिकाणाचा जिल्हा पर्याय निवडा- सहप्रवासी असेल तर त्यांची संख्या नमूद करा- प्रवासाचा अंतिम ठिकाणचा पत्ता नमूद करा- आपण कोरोना कंटेन्मेंट झोनमध्ये आहात का पर्यायी उत्तर निवडा- परतीचा प्रवास याच मार्गाने करणार आहात का पर्यायी उत्तर निवडा- तुमचा पासपोर्ट साइज फोटो अपलोड करा- आधारकार्ड अपलोड करा- डॉक्टरांचे प्रमाणपत्र अपलोड करा आणि शेवटी सबमिट बटन क्लिक करा.

ऑनलाइन ई-पास मिळवण्यासाठी अडचणी आल्यास संपर्क : पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील. यांचे कार्यालय. पैठणगेट येथील बाळ गंगाधर टिळक व्यापारी संकुल. फोन नंबर- (०२४०)-२२४०५०३१) पोलीस उपनिरीक्षक सतीश भोसले.२) पोलीस शिपाई निरज कुलकर्णी३) पोलीस शिपाई जगदीश शिंदे.

पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांचे कार्यालय, संभाजी कॉलनी, सिडको, एन- ६, मध्यवर्ती जकात नाकाजवळ.फोन नंबर- (०२४०)-२२४०५९४ .१) सहायक पोलीस निरीक्षक वामन बेले.२) पोलीस शिपाई राजू पवार३) हवालदार प्रमोद पवार.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद