शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Corona vaccine : अडथळ्यांची शर्यत ! शहरात कोरोनामुक्तीसाठी लसीचा पुरेसा साठा मिळण्यात महापालिकेला अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 2:46 PM

Corona vaccination in Aurangabad ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या पाच लाख नागरिकांना अद्याप पूर्ण लस मिळालेली नाही. अशा परिस्थितीत नवीन उद्दिष्ट कसे पूर्ण होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

ठळक मुद्दे११५ वॉर्डांमध्ये १४० टीम खास लसीकरणासाठीसध्या लॉकडाऊनमुळे शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे.१,२०० वरून रुग्णसंख्या ५०० पर्यंत आली, मृत्यूदरही नियंत्रणात आहे.दोन दिवस पुरेल एवढाच साठा मिळतोय

औरंगाबाद : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शहरी भागात महापालिका प्रशासनाने योग्य वेळी केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्येत कमालीची घट पाहायला मिळत आहे. संक्रमण रोखण्यात लसीकरण महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी महापालिकेने व्यापक लसीकरण मोहीम सुरू केली. शासनाकडून साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शहरात आतापर्यंत दोन लाख नागरिकांना लस देण्यात आली. शुक्रवारी दुपारी अचानक लस संपल्यामुळे मोहीम थांबवावी लागली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाने दररोज दहा हजार नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले होते. शहरात ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांची संख्या पाच लाख एवढी आहे. आतापर्यंत २ लाख लस मनपाला देण्यात आल्या. त्या शुक्रवारी संपल्या. प्रशासनाला ८० पेक्षा अधिक लसीकरण केंद्रे दुपारनंतर बंद करावी लागली. आरोग्य क्षेत्रातील जाणकार मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सध्या लस हेच एक प्रभावी शस्त्र आहे. भविष्यात कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण वरदान ठरेल. शासन आदेशानुसार आता महापालिका प्रशासनाने अठरा वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या प्रत्येकाला लस देण्याचे नियोजन केले आहे. दहा लाख नागरिकांना लस द्यावी लागणार आहे. ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या पाच लाख नागरिकांना अद्याप पूर्ण लस मिळालेली नाही. अशा परिस्थितीत नवीन उद्दिष्ट कसे पूर्ण होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

११५ वॉर्डांमध्ये १४० टीम खास लसीकरणासाठीकेंद्र शासनाने ३० एप्रिलपर्यंत ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण करून घेण्याचे निर्देश दिले. शहरात ११५ वॉर्डांमध्ये १४० टीम खास लसीकरणासाठी नेमण्यात आल्या. लसीकरण मोहिमेला नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. दररोज सहा ते सात हजार नागरिकांना लस देण्यात येत आहे. शुक्रवारी महापालिकेकडे असलेला लसचा साठा अचानक संपला. 

रुग्णसंख्या घटलीसध्या लॉकडाऊनमुळे शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. १,२०० वरून रुग्णसंख्या ५०० पर्यंत आली. मृत्यूदरही नियंत्रणात आहे. कोरोनाचा मुकाबला करताना जिल्हा प्रशासनासह पोलिसांची भूमिकाही महत्त्वाची ठरत आहे. परिस्थितीत आमूलाग्र सुधारणा होत असताना राज्य शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पालकमंत्री सुभाष देसाई हेसुद्धा लस तुटवडा प्रकरणात लक्ष घालू शकतात.

लवकरच लस उपलब्ध होईललसीकरण मोहीम राबविण्यासाठी महापालिकेकडून साठा सध्या संपलेला आहे. आम्हाला लवकरच लसचा साठा उपलब्ध होईल. त्यानंतर आम्ही पुन्हा नव्या जोमाने लसीकरण मोहीम सुरू करणार आहोत.-आस्तिककुमार पाण्डेय, मनपा प्रशासक 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका