शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कोरोनामुळे स्वत:चे वाहन घेण्यावर भर; दसरा-दिवाळीदरम्यान नवीन बाराशे वाहने येणार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 3:19 PM

दसरा - दिवाळी आधीच शहरात वाहन खरेदीसाठी विविध कंपन्यांच्या अधिकृत वितरकांच्या शोरूमवर ग्राहकांची वर्दळ वाढली आहे.

ठळक मुद्देशहरात दसरा- दिवाळीदरम्यान सुमारे ९ हजार वाहने विक्री होतील, यात २०० कोटींची उलाढाल अपेक्षितसप्टेंबर महिन्यात शहरात सर्व कंपन्यांची दुचाकी, चारचाकी मिळून ५५००० वाहने विक्री झाली.

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणे अत्यावश्यक झाले आहे. परिणामी, शहरवासी सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्यापेक्षा स्वतःच्या हक्काच्या वाहनातून सुरक्षित प्रवास करण्यावर भर देत आहेत. यामुळेच वाहन खरेदीसाठी शोरूममध्ये वर्दळ वाढली आहे. दसरा- दिवाळीदरम्यान सुमारे ९ हजार वाहने विक्री होतील, यात २०० कोटींची उलाढाल होईल, असा होरा वितरक व्यक्त करीत आहेत. 

दसरा - दिवाळी आधीच शहरात वाहन खरेदीसाठी विविध कंपन्यांच्या अधिकृत वितरकांच्या शोरूमवर ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. कारण काही कंपन्यांच्या कार खरेदीसाठी कमीतकमी ५ आठवड्यांची वेटिंग आहे.  चेंबर ऑफ ऑथोराईज ऑटोमोबाईल डीलर्स संघटनेचे अध्यक्ष राहुल पगरिया यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्यात शहरात सर्व कंपन्यांची दुचाकी, चारचाकी मिळून ५५००० वाहने विक्री झाली. शोरूमवर होणारी बुकिंग लक्षात घेता दसरा-दिवाळीदरम्यान ९ हजार नवीन वाहने रस्त्यावर येतील. त्यात १२०० पेक्षा अधिक कारचा समावेश असेल. कार खरेदीत मागील दसरा-दिवाळीच्या तुलनेत १० टक्के वाढ दिसून येत आहे. 

शहरात विविध कंपन्यांच्या ४ लाख ते ७५ लाख  रुपयांपर्यंतच्या कार उपलब्ध आहेत. त्यात ५ लाख ते १० लाखांदरम्यानच्या कार विक्रीचे प्रमाण  ७० टक्के  राहील. तसेच शहरात ५० हजार ते १ लाख रुपयांदरम्यान दुचाकी आहेत. त्यापैकी  ५० हजार ते ७० हजारांदरम्यानच्या सुमारे  ७० टक्के दुचाकी विकल्या जाणार आहेत. ६५ टक्के ग्राहक वित्तसंस्थेकडून कर्ज घेतात. मायलेज जास्त, १२५ सीसीवरील वाहनांवर डिस्काऊंट, कमीत कमी डाऊनपेमेंट व बँकांनी कमी केलेला व्याजदर यामुळे वाहन खरेदीला प्रोत्साहन मिळत आहे. 

महिन्याकाठी ३ हजारांवर नोंदणी यंदा एप्रिल ते जुलै या ४ महिन्यांत केवळ ४ हजार ७९७ नव्या वाहनांची आरटीओ कार्यालयात नोंदणी झाली. ही ४ महिने म्हणजे कोरोनाच्या प्रादुर्भाव सुरू होऊन रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होण्याचा कालावधी होता. त्यामुळे वाहन विक्रीवर परिणाम झाला; परंतु जुलैपासून अनेक बाबी अनलॉक होत गेल्या. त्यामुळे वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल वाढू लागला आहे. ऑगस्टपासून वाहन नोंदणीची स्थिती पूर्वीप्रमाणे होण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिल ते जुलैच्या तुलनेत वाहन नोंदणीत ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये वाढ झाल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी सांगितले.

850 नवीन ट्रॅक्टर ग्रामीण भागात दिसतीलग्रामीण भागातून ट्रॅक्टरची मागणी वाढत आहे. सप्टेंबर महिन्यात ६६० ट्रॅक्टर विक्री झाले. यावरून याची प्रचीती येते. दसरा- दिवाळीदरम्यान नवीन  ८५० ट्रॅक्टर ग्रामीण भागात धावतील, असेही वितरकांनी सांगितले.

वर्ष २०१९ ची स्थितीएप्रिल ते जुलै या ४ महिन्यांत  तब्बल २४ हजार ४७६ नव्या वाहनांची नोंदणी झाली होती, तर ऑगस्टमध्ये ४ हजार ४९, सप्टेंबरमध्ये ३ हजार ९३३ आणि ऑक्टोबरमध्ये ६ हजार ५३१ वाहनांची नोंदणी झाली होती.

वर्ष २०२० ची स्थितीएप्रिल ते जुलै या ४ महिन्यांत सर्व प्रकारच्या केवळ ४ हजार ७९७ नव्या     वाहनांची नोंदणी झाली. ऑगस्टमध्ये ३ हजार ११९, सप्टेंबरमध्ये ३ हजार ८४२ वाहनांची नोंदणी झाली  आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याDiwaliदिवाळी 2022