शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

कोरोनाविरुद्ध लसींची ढाल अखेर मराठवाड्यात; १ लाख ३० हजार ५०० डोस प्राप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 1:02 PM

Corona vaccine in Marathwada पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या केंद्रातून मंगळवारपासून लसींचे कंटेनर देशाच्या विविध भागांत रवाना होण्यास सुरुवात झाली.

ठळक मुद्देऔरंगाबादसह जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांसाठी लसीचे ६४ हजार ५०० डोस प्राप्त लातूरसह नांदेड, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांसाठी ६६ हजार डोस मिळाले.

औरंगाबाद : अवघ्या देशवासीयांचे ज्या कोरोना लसीकडे लक्ष लागले होते, ती लस अखेर बुधवारी सकाळी पुण्याहून औरंगाबादेत दाखल झाली. कोरोनाविरुद्ध गेल्या १० महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध जिंकण्यासाठी पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी मराठवाड्यास लसीचे १ लाख ३० हजार ५०० डोस मिळाले. यात औरंगाबाद आरोग्य उपसंचालक विभागास ६४ हजार ५०० डोस प्राप्त झाले, तर एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ३४ हजार डोस मिळाले आहेत.

देशात १६ जानेवारीपासून कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. जगभरातील ही सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असणार आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या केंद्रातून मंगळवारपासून लसींचे कंटेनर देशाच्या विविध भागांत रवाना होण्यास सुरुवात झाली. औरंगाबादसाठी बुधवारी पुण्याहून पहाटे पाच वाजता लसींचे बॉक्स घेऊन निघालेला कंटेनर सकाळी नऊ वाजता सिडकोतील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात दाखल झाला. आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे यांच्या उपस्थितीत लसींचा साठा उतरवून घेण्यात आला. फार्मासिस्ट संजय भिवसने, रामअप्पा गुजरे यांनी लसीचे बॉक्स केंद्रातील कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवण्यासाठी परिश्रम घेतले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही येथे भेट दिली. यावेळी आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. अमोल गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, औषध निर्माण अधिकारी वर्षा औटे, आदी उपस्थित होते. औरंगाबाद आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबादसह जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांसाठी लसीचे ६४ हजार ५०० डोस प्राप्त झाले आहेत. त्यांचे जिल्ह्यानुसार वितरणही करण्यात आले.

लातूर विभागासाठी ६६ हजार डोस रवानालातूर आरोग्य उपसंचालक कार्यालयाअंतर्गंत लातूरसह नांदेड, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांसाठी ६६ हजार डोस मिळाले. हे डोस घेऊन आरोग्य विभागाचे अन्य वाहन लातूरला रवाना झाले.

छावणीसाठी १९०, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ४० लसऔरंगाबाद जिल्ह्याला मिळालेल्या ३४,२६० डोसमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ३४,०३०, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ४० आणि छावणीतील कर्मचाऱ्यांसाठी १९० डोस मिळाल्या आहेत.

शहरासाठी २० हजार, तर ग्रामीणसाठी १४ हजार डोसशहरातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेला २० हजार डोसचे वितरण करण्यात आले, तर जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अंतर्गंत असलेल्या ग्रामीण भागांतील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी १४ हजार डोस मिळाले.

ठळक मुद्दे : - प्रशिक्षण केंद्रात लसींचे मोठे ५ बॉक्स व काही छोटे बॉक्स ठेवण्यात आले.- एका बॉक्समध्ये १ हजार २०० व्हायल्स (बाटल्या)- एक व्हायल ५ ‘एमएल’ची आहे.- एका व्हायल्समधून १० जणांना डोस दिला जाणार.- औरंगाबाद विभागासाठी लसींचे एकूण ६ हजार ४५० व्हायल्स प्राप्त.- एका मोठ्या बॉक्समध्ये लसीचे १२ हजार डोस.

औरंगाबाद आरोग्य उपसंचालक विभागास मिळालेले डोसजिल्हा- डोसेसची संख्याऔरंगाबाद -३४,०००जालना -१४,५००            परभणी -९,५००हिंगोली -६,५००एकूण -६४,५००

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCorona vaccineकोरोनाची लसMarathwadaमराठवाडा