शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

कॉपीमुक्तीसाठी उदासीनता

By admin | Updated: July 23, 2014 00:41 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित ३८२ महाविद्यालयांपैकी अवघ्या १२ महाविद्यालयांनी यंदा आदर्श परीक्षा केंद्र पुरस्कारासाठी परीक्षा विभागाकडे प्रस्ताव पाठविले आहेत.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित ३८२ महाविद्यालयांपैकी अवघ्या १२ महाविद्यालयांनी यंदा आदर्श परीक्षा केंद्र पुरस्कारासाठी परीक्षा विभागाकडे प्रस्ताव पाठविले आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी उर्वरित ३७० महाविद्यालये उदासीन असल्याचे स्पष्ट होत आहे.संलग्नित महाविद्यालयांमध्ये कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात, यासाठी २००६-०७ पासून आदर्श परीक्षा केंद्र पुरस्कार योजना सुरू केली. २३ आॅगस्ट हा विद्यापीठाचा स्थापना दिवस असून, त्या दिवशी आदर्श परीक्षा केंद्र पुरस्कारासाठी निवड झालेल्या महाविद्यालयांना रोख १० हजार रुपये व सन्मानपत्र देऊन गौरविले जाते.या पुरस्कारामध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयांनी सहभागी होण्यासाठी दरवर्षी जून महिन्यात सर्व महाविद्यालयांना पत्र पाठवून परीक्षा विभागामार्फत प्रस्ताव मागविले जातात. त्यानुसार आतापर्यंत १२ महाविद्यालयांचे प्रस्ताव परीक्षा विभागाला प्राप्त झालेले आहेत.या पुरस्कारासाठी विद्यापीठाने काही निकष ठरविलेले आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी स्वत:च्या इमारतीमध्ये महाविद्यालय असावे, महाविद्यालयांमध्ये ६०० चौ. फूट या मानकाप्रमाणे वर्ग खोल्या असाव्यात, इमारतीमध्ये विद्युत खंडित झाल्यास जनरेटरची सुविधा असावी, विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असावीत, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी, २०१३-१४ मध्ये झालेल्या परीक्षा कॉपीमुक्त असाव्यात, परीक्षा पारदर्शीपणे घेतल्या जाव्यात, या निकषांची अधिकार मंडळाने पडताळणी केल्यानंतरच संबंधित महाविद्यालयांची पुरस्कारासाठी निवड केली जाते. दरम्यान, बहुतांश संलग्नित महाविद्यालयांमध्ये सोयी-सुविधांचा मोठा अभाव आहे. अनेक महाविद्यालयांना टिकून राहण्यासाठी ते कॉपीमुक्त परीक्षेच्या धोरणाला अप्रत्यक्षपणे विरोधच करतात. त्यामुळे त्यांना विद्यापीठाची संलग्नताही बिनबोभाट दिली जाते. त्यामुळे अशी महाविद्यालये या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या भानगडीत पडत नाहीत, असे विद्यापीठातील अधिकारी खाजगीत बोलतात.चारच महाविद्यालयांना पुरस्कार२०१२-१३ या शैक्षणिक वर्षात फक्त चारच महाविद्यालयांना आदर्श परीक्षा केंद्र पुरस्काराने २३ आॅगस्ट रोजी गौरविण्यात आले. यामध्ये औरंगाबादेतील जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय, जालना येथील जे. ई. एस. महाविद्यालय, बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय व उस्मानाबाद येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा समावेश होता.