शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रोडरोमिओंना नागरिकांचा चोप

By admin | Updated: July 20, 2014 00:29 IST

अंबड : विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना नागरिकांनी जोरदार चोप दिल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजेदरम्यान शहरातील नूतन वसाहत भागात घडली.

अंबड : विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना नागरिकांनी जोरदार चोप दिल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजेदरम्यान शहरातील नूतन वसाहत भागात घडली. नागरिकानंतर पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांच्या पथकानेही रोडरोमिओंना नागरिकांसमोरच बेदम चोप दिल्याने शहरातील रोडरोमिओंचे धाबे दणाणले आहे. मागील काही काळापासून अंबड शहर हे शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित होत आहे. शहरात शासकीय तंत्रनिकेतन, तीन वरिष्ठ महाविद्यालय, तीन कनिष्ठ महाविद्यालयांसह आठ माध्यमिक विद्यालये, बी. एड. महाविद्यालय, डी.एड.महाविद्यालय आदी विविध शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. या शैक्षणिक संस्थामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. शहराबरोबरच बाहेर गावातील विद्यार्थीही मोठ्या संख्येने या शिक्षणसंस्थामध्ये शिक्षण घेत आहेत. अंबड शहर एज्युकेशनल हब म्हणून उदयास येत आहे. वाढत्या शैक्षणिक संस्थांमुळे शहरात खाजगी शिकवण्याही मोठ्या प्रमाणावर सुरु झाल्या आहेत. खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणी घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही शेकडोंच्या घरात आहे. शहरातील शैक्षणिक संस्थामध्ये व विद्यार्थ्यांमध्ये वाढ होत असतानाच मागील काही काळात शहरात रोडरोमिओंकडून उपद्रव वाढला ओ. बसस्थानक परिसर, स्वामी समर्थ मंदिर परिसर, मत्स्योदरी देवी मंदिर परिसर, पाचोड नाका ते शासकीय तंत्रनिकेतन रोड, ओमशांती महाविद्यालय रोड, कोर्ट रोड, मत्स्योदरी विद्यालय व महाविद्यालय रोड आदी विविध ठिकाणी रोडरोमिओंचे घोळके विद्यार्थिनींची छेड काढतात. दुचाकीवरुन ट्रिपल सीट फिरणे, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, दुचाकीने विद्यार्थिनींना कट मारणे आदी प्रकार शहरात घडत आहेत. पोलिसांनी कारवाई सुरु करताच रोडरोमिओ गायब होतात. कारवाई थंडावताच पुन्हा सक्रिय होतात. या घटनेनंतर पोलिसांनी रोडरोमिओंना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे. (प्रतिनिधी)