शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

दाखला देण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना सहशिक्षक चतुर्भुज

By admin | Updated: July 25, 2014 00:30 IST

भोकरदन : शाळा सोडण्याच्या प्रमाणपत्राची (टीसी) दुसरी प्रत देण्याकरिता विद्यार्थ्याकडून पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव सपकाळ येथील सहशिक्षक आर.बी. जाधव यास गुरूवारी रंगेहाथ पकडले.

भोकरदन : शाळा सोडण्याच्या प्रमाणपत्राची (टीसी) दुसरी प्रत देण्याकरिता विद्यार्थ्याकडून पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव सपकाळ येथील सहशिक्षक आर.बी. जाधव यास गुरूवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. जळगाव सपकाळ येथील विनय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सहशिक्षक असलेल्या आर.बी. जाधव यांच्याकडे लिपिक पदाचाही कार्यभार आहे. २०१२ मध्ये याच विद्यालयातील बारावी उत्तीर्ण झालेल्या जळगाव सपकाळ येथील विद्यार्थी सतीश समाधान नेमाणे याच्याजवळील टीसी हरवली होती. त्यामुळे त्यांना टीसीची दुसरी प्रत पाहिजे होती. सतीश यांनी सहशिक्षक जाधव यांच्याकडे १६ जुलै रोजी अर्ज सादर केला. तेव्हा टीसीसाठी ५०० रुपये लागतील, असे जाधव यांनी म्हटले होते. लाच देण्याची इच्छा नसल्याने सतीशने जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून यासंबंधीची लेखी तक्रार केली. त्यानुसार आज दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने विद्यालयाच्या आवारात सापळा रचला. टीसी देण्याकरिता ५०० रुपयांची लाच स्वीकारताना जाधव यांना या पथकाने रंगेहाथ पकडले व अटक केली.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संजय बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक प्रताप शिकारे, पो.नि. व्ही.बी. चिंचोले, पोउपनि एस.एल. मेहत्रे, पोलिस कर्मचारी संजय उदगीरकर, गंभीर पाटील, प्रदीप उबाळे, रमेश चव्हाण आदी कर्मचाऱ्यांनी यशस्वी केली. (प्रतिनिधी)