दुचाकीचा धक्का लागल्याने वाद उफाळला; दोन गट भिडले

By राम शिनगारे | Updated: April 11, 2023 20:17 IST2023-04-11T20:16:55+5:302023-04-11T20:17:09+5:30

इंदिरानगर येथील घटना : जवाहरनगर ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल

Controversy erupted after the bike struck; The two groups clashed | दुचाकीचा धक्का लागल्याने वाद उफाळला; दोन गट भिडले

दुचाकीचा धक्का लागल्याने वाद उफाळला; दोन गट भिडले

छत्रपती संभाजीनगर : दुचाकीस्वाराच्या धडकेत मुलगी जखमी झाल्यानंतर दोन गटात बेदम हाणामारी झाली. हि घटना ९ एप्रिलला सायंकाळी सहाच्या सुमारास इंदिरानगर भागात घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे जवाहरनगर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आले आहेत.

राजू काकासाहेब गायकवाड (रा. मायावरी बौद्धविहार जवळ) हा दुचाकीने लायटिंग आणण्यासाठी शिवाजीनगर भागाकडे निघाला होता. रस्त्यात अचानक लहान मुलगी दुचाकीसमोर आली. तेव्हा आरोपी मिसबा पटेल याने राजू याला शिविगाळ करून दुचाकी सावकाश चालव असे म्हणत मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. नंतर सहा ते सात जणांच्या टोळक्याने येऊन राजुला बेदम मारहाण केली. तर बालम बशीर शेख ( रा. इंदिरानगर) याने दिलेल्या तक्रारीनुसार, पत्नीसह मुलगी जारा हे किराणा साहित्य आणायला जात असताना राजू याने मुलीला धडक दिली. त्याला समजावून सांगत असताना राजू याने बालम यांच्यसह नातेवाईकांना मारहाण केली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे नोंदविण्यात आल्याचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी सांगितले.

Web Title: Controversy erupted after the bike struck; The two groups clashed