कॅन्सर हाॅस्पिटलमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
By संतोष हिरेमठ | Updated: January 16, 2025 11:50 IST2025-01-16T11:50:22+5:302025-01-16T11:50:43+5:30
शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला आहे.

कॅन्सर हाॅस्पिटलमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
छत्रपती संभाजीनगर : शासकीय कर्करोग रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. गेल्या ३ महिन्यापासून वेतन थकलेले असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ही आंदोलन पुकारले आहे.
शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. कंत्राटदाराने ३ महिन्यांपासून वेतन केलेले नाही. शिवाय वेतनात कपात करण्याचाही अजब निर्णय घेण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. तात्काळ थकीत वेतन देण्यात यावे आणि कमी करण्यात आलेले वेतन पूर्ववत करण्यात यावे. अन्यथा आंदोलन सुरुच राहील, अशा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.