शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
2
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
3
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
4
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
6
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
7
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
8
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
9
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
10
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
11
Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर
12
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
13
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
14
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
15
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
16
Bhuban Badyakar : 'कच्चा बादाम' फेम भुबन बड्याकरची मोठी फसवणूक; मनोरंजन सृष्टीतील लोकांनी स्वप्नं दाखवली अन्...
17
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
18
महामार्गांवर नो पार्किंग; ढाबे आणि हॉटेल्सवरही बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!
19
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
20
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम खात्यात कंत्राटदाराचा राडा

By admin | Updated: August 23, 2014 00:55 IST

जालना : येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ व २ च्या कार्यालयात शुक्रवारी एका कंत्राटदाराने अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी करीत कक्षांची प्रचंड तोडफोड केली.

जालना : येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ व २ च्या कार्यालयात शुक्रवारी एका कंत्राटदाराने अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी करीत कक्षांची प्रचंड तोडफोड केली. गेल्या काही महिन्यांपासून बांधकाम खात्याच्या दोन्ही विभागात तथाकथित कंत्राटदार व सामाजिक कार्यकर्त्यांनी दररोज अधिकारी, कर्मचाऱ्यांना अरेरावी सुरु केली आहे. न केलेल्या कामांच्या बिलांची मागणी करीत हे तथाकथित कंत्राटदार शिवीगाळ करीत धमक्याही देऊ लागले आहेत. दररोजच्या या प्रकाराने अधिकारी-कर्मचारी भयभीत झाले असून ते कार्यालयाकडे फिरकेनासे झाले आहेत.विशेष म्हणजे या परिसरात पोलिस चौकी आहे. मात्र कर्मचारी तैनात नाही. चौकी २४ तास बंद अवस्थेत आहे. त्यामुळेच तथाकथित कंत्राटदाराचा प्रचंड उपद्रव वाढला आहे. लोकप्रतिनिधींचा वरदहस्त असणाऱ्या या उपद्रवी मंडळींच्या तथाकथित कारवायांमुळे परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे. शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास एका कंत्राटदाराने या परिसरात अधिकारी-कर्मचाऱ्यांना बिलांच्या कारणावरुन शिवीगाळ करीत धमक्या दिल्या. यासंदर्भात खाजगी सुरक्षा रक्षकाने त्या परिस्थितीची पोलिसांना कल्पना दिली. मात्र पोलिस फिरकले नाही. त्याचा परिणाम म्हणजे कंत्राटदाराने सायंकाळी ४ च्या सुमारास कार्यालयात येऊन हॉकीस्टीकने कक्षांची तोडफोड सुरु केली. सात कक्षांतील काचांच्या तावदानासह फर्निचरचे मोठे नुकसान झाले. (प्रतिनिधी)