शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

भरधाव कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 1:11 AM

पैठण रोडवरील कांचनवाडी येथील हॉलीवूड ढाब्यासमोर मंगळवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास एका कंटेनर (एचआर-५६ बी-७५०९)ची दुचाकीला (एमएच-२० ईडी-३९५२) धडक बसल्याने एक जण जागीच ठार झाला. या अपघातात अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पैठण रोडवरील कांचनवाडी येथील हॉलीवूड ढाब्यासमोर मंगळवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास एका कंटेनर (एचआर-५६ बी-७५०९)ची दुचाकीला (एमएच-२० ईडी-३९५२) धडक बसल्याने एक जण जागीच ठार झाला. या अपघातात अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.मयताचे नाव सागर लहुरे (२४, पैठणखेडा), असे असून पाराजी दुबिले (२५, रा. बाभूळगाव), गजानन शिंदे (३५, बाभूळगाव) हे गंभीर जखमी आहेत.औरंगाबादहून पैठणखेडाकडे तिघे जण दुचाकीवर बसून जात होते. कांचनवाडीजवळील हॉलीवूड ढाब्यासमोर औरंगाबादकडे येणाऱ्या कंटेनर आणि दुचाकीची जोराची धडक झाली. या अपघातात सागर लहुरेच्या अंगावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी होऊन मरण पावला, तर पाराजी दुबिले व गजानन शिंदे या दोघांना नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी शासकीय दवाखान्यात हलविले. पैठण रोडवर अपघात झाल्याने वाहतूक किमान तासभर खोळंबली होती.अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, कैलास प्रजापती व अन्य कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावरील वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. घाटी परिसरात अपघातातील मयत व जखमीच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. सातारा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू