भरधाव कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:11 IST2018-07-11T01:11:33+5:302018-07-11T01:11:50+5:30
पैठण रोडवरील कांचनवाडी येथील हॉलीवूड ढाब्यासमोर मंगळवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास एका कंटेनर (एचआर-५६ बी-७५०९)ची दुचाकीला (एमएच-२० ईडी-३९५२) धडक बसल्याने एक जण जागीच ठार झाला. या अपघातात अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

भरधाव कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पैठण रोडवरील कांचनवाडी येथील हॉलीवूड ढाब्यासमोर मंगळवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास एका कंटेनर (एचआर-५६ बी-७५०९)ची दुचाकीला (एमएच-२० ईडी-३९५२) धडक बसल्याने एक जण जागीच ठार झाला. या अपघातात अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मयताचे नाव सागर लहुरे (२४, पैठणखेडा), असे असून पाराजी दुबिले (२५, रा. बाभूळगाव), गजानन शिंदे (३५, बाभूळगाव) हे गंभीर जखमी आहेत.
औरंगाबादहून पैठणखेडाकडे तिघे जण दुचाकीवर बसून जात होते. कांचनवाडीजवळील हॉलीवूड ढाब्यासमोर औरंगाबादकडे येणाऱ्या कंटेनर आणि दुचाकीची जोराची धडक झाली. या अपघातात सागर लहुरेच्या अंगावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी होऊन मरण पावला, तर पाराजी दुबिले व गजानन शिंदे या दोघांना नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी शासकीय दवाखान्यात हलविले. पैठण रोडवर अपघात झाल्याने वाहतूक किमान तासभर खोळंबली होती.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, कैलास प्रजापती व अन्य कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावरील वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. घाटी परिसरात अपघातातील मयत व जखमीच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. सातारा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.