शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरने दुचाकीस उडवले; १ जागीच ठार

By admin | Updated: November 17, 2014 12:20 IST

भरधाव वेगाने जाणार्‍या कंटेनरने नरवाडी शिवारात दुचाकीस उडविले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य एकजण गंभीररित्या जखमी झाला.

 आखाडा बाळापूर : भरधाव वेगाने जाणार्‍या कंटेनरने नरवाडी शिवारात दुचाकीस उडविले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य एकजण गंभीररित्या जखमी झाला. हा अपघात बाळापूर- हिंगोली रस्त्यावर नरवाडी शिवारात १६ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा दहा वाजता घडला. कळमनुरी येथील रहिवासी असलेले जमीरखाँ सलीमखाँ पठाण (वय २४) व शेख तौसिफ शेख रहीम हे दोघेजण नवीन विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून आखाडा बाळापूर जवळील कांडली येथे लग्न समारंभासाठी जात होते. सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास कंटेनर (क्र. एम.आर. ५५ एस. ३३३१) हा हिंगोलीकडे भरधाव वेगात जात होता. नरवाडी शिवारात कंटेनरने सदर दुचाकीस अक्षरश: चिरडले. यात जमीरखाँ पठाण हा युवक जागीच ठार झाला. तर शेख तौसिफ हा गंभीर जखमी झाला. कळमनुरीच्या ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी हिंगोलीला हलविले. धडक दिल्यानंतर कंटेनरचालक गाडी सोडून पळून गेला. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अली करीत आहेत. /(वार्ताहर)