शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा दक्षिण तट अभेद्यच...

By admin | Updated: May 18, 2014 01:25 IST

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलणार्‍या नांदेड दक्षिण मतदारसंघाने आपला तट अभेद्यच ठेवला़

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलणार्‍या नांदेड दक्षिण मतदारसंघाने आपला तट अभेद्यच ठेवला़ अल्पसंख्याकांच्या मतांचे विभाजन करण्याचा प्रतिस्पर्ध्यांचा डाव त्यांच्याच अंगावर उलटून पडला़ नांदेड उत्तरनंतर अशोकरावांना मताधिक्य देण्यात दक्षिणने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे़ २००९ मध्ये या मतदारसंघात खा़ भास्करराव पाटील खतगावकर यांना ६१०९८ तर भाजपाच्या संभाजी पवार यांना ३७२१६ मते पडली होती़ त्यावेळी भास्कररावांना या मतदारसंघाने २३८८२ मतांची आघाडी दिली होती़ यावेळेस खुद्द अशोकराव चव्हाणच उमेदवार असल्याने मताधिक्य वाढणार हे निश्चित होते़ त्यात दक्षिणमध्ये अशोकरावांना ८८७०० तर डी.बी. पवार यांना ६१६०४ मते पडली़ गतवेळच्या निवडणुकीपेक्षा मताधिक्यात वाढ होवून ते २७०९६ पर्यंत पोहोचले़ मतदारसंघाचे नेतृत्व करीत असलेले आ़ ओमप्रकाश पोकर्णा यांची या भागातील कामे, जनसंपर्क तसेच महापौर अब्दुल सत्तार यांचे या भागातील वजन या काँग्रेसच्या जमेच्या बाजू होत्या़ त्याचबरोबर एमआयएमचा उमेदवार रिंगणात नसणे हेही काँग्रेसच्या पथ्यावर पडले़ त्यामुळे या भागातील अल्पसंख्याक समाजाची एकगठ्ठा मते अशोकरावांच्या पारड्यात पडली़ मतांचे विभाजन करुन आपला डाव साधण्याचे प्रतिस्पर्ध्यांचे मनसुबे नांदेड दक्षिणच्या मतदारांनी नंदगिरीच्या तटावरुन गोदावरीत नेवून बुडविले हेही निश्चित़ मतदारसंघात जुने नांदेड, धनेगांव, बळीरामपूर, विष्णूपुरी, सिडको आदी भागात कॉॅग्रेसचा वरचष्मा आहे़ ग्रामीण भागात काँग्रेसने केलेली विकासकामे आणि विद्यमान आमदारांचा या भागातील जनसंपर्क याचा फायदा या निवडणुकीत काँग्रेसला झाला़ अशोकरावांनी दक्षिण नांदेडातील व्यापारी, प्रतिष्ठित मंडळी, विविध समाजातील प्रमुखांच्या बैठका घेतल्या होत्या़ त्याचा चांगला परिणाम झाला़ दक्षिण नांदेडात काँग्रेसची असलेली मजबूत फळी, एमआयचा उमेदवार रिंगणात नसल्यामुळे अल्पसंख्यांकांची एकगठ्ठा मते काँग्रेसच्या पारड्यात पडली़ शहरासह ग्रामीण भागातील मतदारही अशोकरावांच्या पाठीशी खंबीरपणे होता़