शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसही ११३ जागा लढविणार

By admin | Updated: April 7, 2015 01:29 IST

औरंगाबाद : मनपा निवडणुकीत बहुचर्चित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार नाही, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. कारण काँग्रेसने सर्वच्या सर्व ११३ जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद : मनपा निवडणुकीत बहुचर्चित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार नाही, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. कारण काँग्रेसने सर्वच्या सर्व ११३ जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.ज्या उमेदवारांचे पक्षाने तिकीट पक्के केले, त्यांना बोलावून बी फॉर्म देण्यास आज दुपारपासून प्रारंभ करण्यात आला. हे काम आमदार सुभाष झांबड यांच्या सिडको निवासस्थानातून सुरू झाले. याठिकाणी निरीक्षक सचिन सावंत, बाळासाहेब देशमुख, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम व आ. सुभाष झांबड हे स्वत: उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत बी फॉर्म वाटपाचे काम सुरू होते. या प्रतिनिधीशी बोलताना सचिन सावंत व आ. सुभाष झांबड यांनी सांगितले की, काँग्रेसमध्ये कुठेही मतभिन्नता वा गटबाजी नाही. आम्हाला सर्व वॉर्डांतून उमेदवारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातील निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊन तिकिटे पक्की करण्यात आली व त्या संबंधित उमेदवारांना निरोप देऊन बोलावून घेण्यात आले व त्यांना बी फॉर्मचे वाटप सुरू करण्यात आले. आ. झांबड यांच्या निवासस्थानासमोर उमेदवारांची गर्दी पाहावयास मिळाली. जितेंद्र देहाडे, डॉ. पवन डोंगरे, अ‍ॅड. सय्यद अक्रम व राजकुमार जाधव आदी मंडळी सचिन सावंत, बाळासाहेब देशमुख यांना सहकार्य करीत होती. अर्ज भरल्यानंतर उद्या दुपारी आम्ही सर्व उमेदवारांची नावे जाहीर करू, असे झांबड यांनी सांगितले. १० ते १५ जागांचा वाद सुरू आहे. त्यातल्या काही जागांवर युवक काँग्रेसने दावा केला आहे. हा वाद आम्ही लवकरच संपवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उमेदवारी यादी आधीच जाहीर न करता तिकीट पक्के झालेल्या उमेदवाराला बी फॉर्म देण्याच्या या पद्धतीमुळे संभाव्य बंडखोरीला आळा बसेल, असे मानले जात आहे.