शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पक्षाकडून जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय आढावा पूर्ण

By admin | Updated: July 21, 2014 00:37 IST

नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ झाला असून काँग्रेस पक्षाने जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला़ या आढाव्यात पक्षाचे पदाधिकारी यांची मते जाणून घेण्यात आली

नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ झाला असून काँग्रेस पक्षाने जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला़ या आढाव्यात पक्षाचे पदाधिकारी यांची मते जाणून घेण्यात आली तसेच इच्छुकांच्या मुलाखतीची प्रक्रियाही पार पाडली़ काँग्रेसचे केंद्रीय पक्षनिरीक्षक तथा आंध्र प्रदेशातील आ़ बी़ चेंगल रायडू यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे समन्वयक विलासराव औताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा आढावा घेण्यात आला़ पूर्णा रस्त्यावरील पावडे मंगल कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत आज रविवारी दुसऱ्या दिवशी नायगाव, कंधार, नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची मते जाणून घेण्यात आली़ त्यात कंधार मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी कंधार तालुका काँग्रेस कमिटीने केंद्रीय निरीक्षकांकडे केली़ दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आघाडी धर्म पाळत राष्ट्रवादीच्या उमेदवारास मदत केली़ निवडूनही आणले़ मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसची पिछेहाट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे़ कंधार व लोहा तालुक्यातील ६० टक्के ग्रा़पं़ वर काँग्रेसचे वर्चस्व आहे़ कंधार पंचायत समिती काँग्रेसकडे, ऩप़तही काँग्रेसचेच सदस्य जास्त, जि़प़ सदस्यांचीही संख्या जास्त अशी परिस्थिती असल्याची बाब पक्षनिरीक्षकांपुढे तालुकाध्यक्ष माधवराव पांडागळे, सरचिटणीस संजय भोसीकर, लोहा विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी डॉ़ श्याम तेलंग यांनी मांडली़नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आ़ ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते व माधवराव पाटील झरीकर हे इच्छुक आहेत़ कंदकुर्ते यांनी २५ वर्षांपासून पक्षाचे काम करत असून संधी मिळावी अशी भूमिका मांडली़नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून मात्र पालकमंत्री डी़पी़ सावंत यांनीच निवडणूक लढविण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली़ अन्य कुणीही इच्छुक या मतदारसंघातून पुढे आला नाही़ अशीच परिस्थिती नायगाव मतदारसंघातही राहिली़ यावेळी पालकमंत्री सावंत, आ़ अमरनाथ राजूरकर, आ़ पोकर्णा, आ़ चव्हाण, महापौर अब्दुल सत्तार आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)