शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

कॉंग्रेस-भाजपत राडा; भाजपत जाऊन पंचायत समितीचे उपसभापती झालेल्या अर्जुन शेळकेंना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 17:40 IST

Congress Vs BJP in Aurangabad : ४ दिवसांपूर्वीच झालेल्या निवडणुकीत केवळ एका मताच्या फरकाने उपसभापती म्हणून कॉंग्रेसमधून भाजपत आलेले अर्जुन शेळके निवडून आले.

औरंगाबाद : औरंगाबादच्या पंचायत समितीमध्ये काँग्रेस आणि भाजप सदस्यांत नुकत्याच झालेल्या उपसभापती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राडा झाला. कॉंग्रेस सोडून भाजपत प्रवेश करत पंचायत समितीचे उपसभापती पद मिळवणाऱ्या अर्जुन शेळके यांना त्यांच्या दालनात मारहाण झाल्याची घटना आज दुपारी घडली. कॉंग्रेसच्या दोन पंचायत समिती सदस्यांसह सात ते आठ कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याची माहिती माजी विधानसभा अध्यक्ष भाजपचे आ. हरिभाऊ बागडे यांनी दिली. ( Arjun Shelke, who joined BJP and became the Deputy Chairman of Aurangabad Panchayat Samiti, was beaten )

अर्जुन शेळके यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर ४ दिवसांपूर्वीच झालेल्या निवडणुकीत केवळ एका मताच्या फरकाने उपसभापती म्हणून शेळके निवडून आले. यात काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. २९ जुलैला रोजी औरंगाबाद पंचायत समितीच्‍या कार्यालयात झालेल्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अनुराग शिंदे यांना ९ मते तर नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अर्जुन शेळके यांना १० मते मिळाली. यानंतर सोमवारी दुपारी नूतन उपसभापती अर्जुन शेळके यांच्या दालनात कॉंग्रेसचे दोन सदस्य आणि सात ते आठ जण आले. अचानक त्यांनी शेळके यांच्यावर हल्ला केला. दालनातील खुर्च्या-टेबलची तोडफोड केली. दालनाच्या खिडक्यांची तोडफोड केली. यात शेळके यांच्या डोक्याला मार लागला आहे. 

...त्यांचा नंतर इलाज करूपराभूत झालेल्या उमेदवाराने मारहाण केल्याची ही पहिलीच घटना असेल. माणुसकीच्या नात्यांनी शेळके यांनी कॉंग्रेस सदस्यांना दालनात बसण्यास खुर्च्या दिल्या. क्षणातच त्यांनी शेळके यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कॉंग्रेसच्या लोकांनी आता तरी समजून घ्यावे. यामुळेच संपूर्ण देशात कॉंग्रेसची पडझड होत आहे. शेळके यांनी आता स्वतःचा इलाज करावा नंतर हल्लेखोरांचा इलाज करू.- हरिभाऊ बागडे, आमदार,भाजप

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी